
जळगाव शहर आम आदमी पार्टीच्या वतीने ज.श.म.न.पा. आयुक्त साहेब यांना जळगाव शहरातील चौक व नॅशनल हायवे नं.06वरील अजिंठा चौफुली. इच्छादेवी चौफुली. आकाशवाणी चौक. वरील सर्कल वर सिग्नल सुरु करण्याची मागणी
गेल्या काही वर्ष्यान पासुन जळगाव शहरातील प्रमुख चौकातील सिग्नल बंद अवस्थेत असून वाहनधारकांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण होत आहे.महिला.लहान मुलं-मुली व वृद्ध.यांना चालण्यासाठी सुद्धा अवघड होत आहे.प्रामुख्याने रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन पार करावा लागत आहे तसेच शहरात अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढत आहे यापेक्षा भयानक स्थिती महामार्ग क्रमांक06 वरील सर्कलवर आहे अवजड वाहनांना ये जा व त्यात शहरी नागरिकांचा रस्ता या मुळे तिघ सर्कल वर खुप मोठ्या प्रमाणात ट्राफिक असते त्यात सर्कलचा व्याप मोठा असल्यामुळे वाहनधारकां समोर गाडी चालवताना गोंधळलेली स्थिती निर्माण होऊन परिणामी अपघात होतात.सदर सर्कलवरील हॅलोजन लाईट बंद असल्याने नागरिकांना आपला जीव मोठे घेऊन सर्कल क्रॉस करावा लागत आहे या ज्वलंत कारणास्त जळगाव शहर आम आदमी पार्टीने जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त साहेब यांना सदरील सर्कलवर योग्य तो मार्ग निघत नाही तोपर्यंत या सर्कलवर सिग्नल लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.यावेळेस जळगाव महानगर कार्याध्यक्ष.योगेश हिवरकर. उपाध्यक्ष. डॉ नारायण आटकोरे- माधवराव जाधव.शहर संघटक प्रमुख रत्नाकर खरोटे. जिल्हा महिला अध्यक्ष डॉ.अनुजा पाटील.जिल्हा मीडिया प्रमुख योगेश भोई.व मिलिंद भाऊ चौधरी.ओम प्रकाश अग्रवाल. प्रमोद पाटील.चंदन पाटील. दुर्गेश निंबाळकर.आदी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते