

!! महाराणा प्रताप विद्यालय बोळे येथे अंधश्रद्धा व व्यसनमुक्ती व्याख्यान!!
आज दिनांक. 29 /12 /2022 रोजी महाराणा प्रताप विद्यालय बोळे ता पारोळा जि जळगाव. येथे अंधश्रद्धा व व्यसनमुक्ती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री आर यु मोरे हे होते या कार्यक्रमाला “अंधश्रद्धा निर्मूलन समिती “- सदस्य, श्री दिलीप खिवसरा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचा सत्कार उपशिक्षक श्री.एस. एस. पाटील व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून करण्यात आला.
या कार्यक्रमास मार्गदर्शन करताना श्री शिवसरा सरांनी सांगितले की अंधश्रद्धेला बळी पडू नका बुवाबाजी,जादूटोणा दोरा-धागा यामुळे आपली आर्थिक लूट होते. तसेच व्यसनामुळे अनेक वाईट गोष्टींना सामोरे जावे लागते सिगारेट, दारू, गुटखा, तंबाखू यांच्या सेवनामुळे कॅन्सर ,हॅडअटॅक ,लखवा, किडनीचे विकार असे आजार होत असतात .आपल्या व्यसनामुळे खर्चही जास्त होतो.घरातील भांडे किंवा शेती गहाण ठेवणे किंवा विकावी लागते त्यामुळे मुलांवरही दुष्परिणाम होतात तसेच घरात भांडणे होतात अशा प्रकारे त्यांनी आपल्या व्याख्यानातून मार्गदर्शन केले.
आमच्या शाळेतून इयत्ता 10 वी. परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीला श्री खिवसरा सरांनी 101 रू.देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री ए.एच.भोसले यांनी केले.
वरिल कार्यक्रमास मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी ,विद्यार्थिनी उपस्थित होते