• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

सोशल मीडियाचा आत्मा मुद्रण कला आहे : सुनिल शक्ती

Feb 25, 2023

Loading

सोशल मीडियाचा आत्मा मुद्रण कला आहे : सुनिल शक्ती

” मीडियाचा आत्मा मुद्रण कला आहे ” असे प्रतिपादन सत्यनारायण प्रेस अमळनेरचे संचालक सुनील शक्ती यांनी केले .शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी मिलिंद ऑफसेट रामचंद्र नगर , जळगाव येथे झालेल्या जागतिक मुद्रण दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून मार्गदर्शन करताना शक्ती बोलत होते.कार्यक्रमास प्रमुख अतिथी विशाल कोल्हे उपस्थित होते .
प्रारंभी अध्यक्षांच्या हस्ते मुद्रण कलेचे जनक योहान्स गुटेनबर्ग यांच्या प्रतिमेचे पूजन शक्ती यांनी करून माल्यार्पण केले.मुद्रण दिनाच्या औचित्याने मिलिंद ऑफसेटचे संस्थापक कैलासवासी शेखर कोल्हे यांच्या कार्याची माहिती मिलिंद कोल्हे यांनी माहिती दिली. गुटेनबर्ग यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने अध्यक्ष शक्ती यांच्या हस्ते केक कापण्यात आला.
प्रमुख अतिथी विशाल कोल्हे यांनी मार्गदर्शनात मुद्रण कलेचे जनक योहान्स गुटेनबर्ग यांचा अल्प परिचय दिला .व्यवसायात कोविडमुळे झालेली आर्थिक वाताहत सांगून नेहमी नेहमी पेपरची होणारी दरवाढ आणि गिर्‍हाईकांची नाराजी यामध्ये आम्ही व्यवसायिक पिसले जातो याची तीव्र खंत सोदाहरण व्यक्त केली.
कार्यक्रमाची प्रस्तावना अनिल ढाके व आभार प्रदर्शन आशिष नन्नवरे यांनी केले.कार्यक्रमास मिलिंद कोल्हे,कृष्णा पवार,संजय नेमाडे , आशीष नन्नवरे, असिफ पिंजारी यासह कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed