अनुदानासाठी कागदपत्रांची पडताळणी उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांच्याकडून कडून पुढच्या आठवड्यात सुरू होणार शिक्षक आमदार ज्ञानेश्र्वर म्हात्रे
ठाणे
जिल्हा प्रतिनिधी- मनिलाल शिंपी)

महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित, त्रुटी पूर्तता आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदान देण्याबाबत 6 फेब्रुवारी 2023 चे पत्र शासनाकडून काढले असून त्यावर , पुढील कारवाई व्हावी म्हणून. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर सातत्याने शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक, यांच्याशी संपर्क करत आहेत,* त्यानुसार शिक्षण संचालकांनी आदेश काढले असून , पुढील कार्यवाही करता राज्यातील सर्व उपसंचालकांनी यावर तातडीने आदेश काढून शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश देणे गरजेचे आहे , बऱ्याच उपसंचालकांनी पत्र काढले असून कोकण विभागातील आणि मुंबईमधील वसंचालकांनी पत्र काढावेत म्हणून मुंबई उपसंचालक श्री संगवे साहेब व कोल्हापूर उपसंचालक श्री चौथे साहेब त्यांच्याशी फोनवर संपर्क साधून पत्र काढण्यासाठी चर्चा केली आहे.
कोल्हापुर विभागाचे पत्र काढले असे चौथे साहेबांनी सांगितले. तर मुंबई विभागाचे पत्र सोमवारी काढले जाईल असे संगवे साहेबांनी सांगितले आहे
सर्व शाळांनी पडताळणीसाठी लागणारे कागदपत्रे तयार ठेवावे
- विष्णू विशे संपर्कप्रमुख यांनी आमचा प्रतिनिधींना दिली आहे.