• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

ज्ञानदा सायन्स क्लासेस अमळनेर मध्ये विज्ञान प्रदर्शना सोबत विज्ञान दिन
उत्साहात साजरा…

Feb 28, 2023

Loading

ज्ञानदा सायन्स क्लासेस अमळनेर मध्ये विज्ञान प्रदर्शना सोबत विज्ञान दिन
उत्साहात साजरा

अमळनेर दि . २८ फेब्रुवारी २०२३: आज विज्ञान दिनानिमित्त अमळनेर शहरातील ज्ञानदा सायन्स क्लासेस मध्ये विज्ञान प्रदर्शन तसेच

इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतचे विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रकल्प मॉडेल आयोजित करण्यात आले, सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या बालवैज्ञानिक गुणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. आर. एस. पाटील सर विज्ञान शिक्षक शहापूर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री . विनायक पाटील सर व श्री. समाधान पवार सर तसेच विज्ञान प्रदर्शन चे परीक्षक डॉ .श्री .निलेश पवार सर ( chemistry department ) प्राध्यापक प्रताप कॉलेज अमळनेर यांनी उत्कृष्ट परीक्षण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानदा क्लासेसचे संचालक प्रा. धिरज पवार सर तसेच आभार प्रदर्शन सौ. स्वाती पवार मॅडम यांनी केले , विज्ञान प्रदर्शन स्पर्धेचा निकाल- प्रथम क्रमांक चि. पूर्वेश पाटील (इयत्ता 8वी), द्वितीय क्रमांक कु. दिशा पवार (इयत्ता 8वी), तृतीय क्रमांक चि.जयेश पाटील (इयत्ता 5वी), तसेच उत्तेजनार्थ कु . गायत्री पाटील (इयत्ता 7वी) आणि चि. यश चौधरी (इयत्ता 9वी) यांना बक्षिसे पटकावली. इतर सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली .कार्यक्रमाला अमळनेर पी. टी.ए. अध्यक्ष श्री. भैय्यासाहेब मगर सर व सर्व पदाधिकारी नी भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *