
आधी दर्शन ‘मंगळा’चे नंतर जिल्हा बँक अध्यक्षपदाचा घेणार चार्ज-संजय पवार.
अमळनेर:
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात अतिशय चुरस निर्माण होऊन संजय मुरलीधर पवार यांची अध्यक्षपदी निवड झाली. पवार यांनी या निवडीनंतर सर्वप्रथम श्री मंगळग्रह मंदिरात येऊन मंगळग्रह देवतेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मी निवडणुकीआधीही श्री मंगळग्रह देवतेच्या दर्शनाला आलो होतो. मात्र, याची वार्ता कुणालाही लागू दिली नव्हती. आता श्री मंगळग्रह देवतेच्या कृपाशीर्वादाने अध्यक्षपदी निवडून आलो. त्यामुळे येथून गेल्यावर आपण पदभार स्वीकारू, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की , मी गेली ३४ वर्षे वारकरी परंपरा जपत आहे. यात फक्त एकच वेळा खंड पडला, तोही जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे. यावेळी माजी महापौर विष्णू भंगाळे ,पंचायत समितीचे माजी सभापती संदीप पाटील, जि.प.चे माजी सदस्य गिरीश पाटील,मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे यांच्यासह सेवेकरी विनोद कदम, बाळा पवार यांनी पवार यांचे स्वागत केले. त्यानंतर पवार व उपस्थितात मंगळग्रह सेवा संस्था व जिल्हा बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी काही उपक्रम राबविले जातील का? याबाबत चर्चा झाली.