
ब्राम्हणशेवगे येथे वडिलांचे स्मरणार्थ स्मशानभूमीत वृक्षारोपण.
सारीच्या दिवशी सारीची रक्षा झाडांना देत नदी प्रदुषण टाळत पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश.
ब्राम्हणशेवगे ता.चाळीसगाव
येथे वृक्षारोपण व पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. तसेच अवैध वृक्षतोड ही गावाने बंद केली आहे. गाव शिवारात वाढदिवस, आई- वडीलांचे स्मरणार्थ वृक्षारोपण, आपल्या आप्तेष्ट, मित्र परिवार यांचे वाढदिवस, लग्नसमारंभ किंवा स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात येते.
अशाच प्रकारे एक आदर्श प्रथा गावातून सुरु झाली आहे ती म्हणजे आपले नातेवाईकांच्या निधनानंतर सारीच्या दिवशी सारीची रक्षा नदीत न विसर्जित करता स्मशानभूमीतच झाड लाऊन ती रक्षा झाडांना देण्याची.नुकतेच ब्राम्हणशेवगे येथील पंचक्रोशीतील सुपरिचित लहान मुलांना बाल वयात चांगले संस्कार निर्माण व्हावेत.यासाठी गेली अनेक वर्ष बैठकी घेणारे ह.भ.प.राजधर यादव देसले यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.जुण्यारुढी परंपरांना फाटा देत सारीची रक्षा नदीत फेकून न देता आपल्या वडीलांचे नेहमी स्मरण व्हावे यासाठी त्यांचा मुलगा भुषण देसले व ग्रामस्थांनी स्मशानभूमीत वडाचे व कडूलिंबाचे झाड लाऊन सारीची रक्षा झाडांच्या मुळाला देऊन नदी प्रदुषण न करण्याचा व पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. या त्यांच्या स्तुत्य व परिवर्तन वादि उपक्रमाचे सर्वत्र कौतीक होत आहे.