
श्रीकृष्ण कॉलनीचे फलकाचे अनावरण थाटात संपन्न
अमळनेर- साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी अमळनेर येथील श्रीकृष्ण कॉलनीचे फलकाचे अनावरण अभियंता मिलेश लांडगे यांनी फित कापून केले. सदर प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब बन्सीलाल भागवत यांनी श्रीफळ फोडून उद्घाटन केले. यावेळी पिंपळे रोड परिसरातील रमेश पाटील, अशोक पाटील, राजू सोनगीरे, योगेश पाटील, गुलाबसींग पाटील, विकास पाटील, शशिकांत पाटील, संजय पाटील, नरेश न्हाळदे, कैलास अहिरे, विक्की पाटील, एन. के.पाटील, के.बी.पाटील, सूर्यकांत खैरनार, राजेंद्र चौधरी, जयेश लांडगे, सोनू पाटील पवार सर युवराज पाटील आदि उपस्थित होते.