• Sun. Jul 6th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

जीवातम्याचा प्रयाण काल समजण्यासाठी अध्यात्मविद्या महत्वाची…. ह.भ.प डॉ रविंद्र भोळे

Mar 24, 2023

Loading

जीवातम्याचा प्रयाण काल समजण्यासाठी अध्यात्मविद्या महत्वाची…. ह.भ.प डॉ रविंद्र भोळे

उरुळीकांचन : पिंडी ते ब्रम्हांडी पंच तत्वाने व्यापून आहे. जे जे पिंडात आहे तेते पंच महाभूते ब्रम्हांडात आहेत. पंचमहाभुतांचा अभ्यास भौतिक विज्ञानाव्दारे करणे श्यक्य आहे. मात्र जीव व आत्मत्तत्व समजण्यासाठी गितेसारख्या धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. जिवतम्याचा प्रयाण काल, प्रवास समजण्यासाठी अध्यात्म विद्या ग्रहण करने महत्वाचे आहे असे मत ज्येष्ठ समाजसेवक हभप डॉ रविंद्र भोळे ह्यांनी येथे व्यक्त केले . श्री राम जन्मोत्सवानिमित्ताने श्री राम मंदिरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी परायण व अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन श्री उरुळी कांचन देवस्थान संस्था व श्री राम मंदिर समितीच्या वतीनेकरण्यात आले आहे . ह्या प्रसंगी द्वितीय पुष्प गुंफताना प्रवचनात डॉ रविंद्र भोळे ह्यानी वरील प्रतिपादन केलें. ह्या प्रसंगी महात्मा गांधी निसर्गोपचार ट्रस्ट चे विस्वस्त श्री ज्ञानोबा उर्फ माउली नाना कांचन ह्यांचे हस्ते डॉ रविंद्र भोळे ह्यांना सन्मानीत करण्यात आले. ह्या प्रसंगी गावकरी,भाविक भक्त, अनेक हरिभक्त महाराज उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed