
जळगांव जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी शुभांगी ताई सरसावल्या
जळगाव जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभांगी ताई पाटील यांनी काल जळगाव येथे जाऊन शासकीय तंत्रनिकेतन येथे सुरू असलेल्या माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव व प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील साहेब यांची भेट घेत शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात निवेदन सादर करत शिक्षकांचे प्रश्न सोडवले निवेदनामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील शिक्षकांचे दर महिन्याचे वेतन वेळेवर होत नसल्याबाबतच्या तक्रारी संदर्भात महिन्याच्या पाच तारखेच्या आत वेतन करण्यात यावे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मेडिकल बिले पीएफ तसेच सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमा इत्यादी प्रलंबित रकमा अदा करणे तसेच जिल्ह्यातील प्रलंबित असलेले शालार्थ आयडी व संच मान्यता देण्याबाबत चर्चा केली, त्याचप्रमाणे विनाअनुदानित शिक्षकांचा प्रमुख प्रश्न म्हणजे विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांवरील 20 40 व 60% साठी पात्र झालेल्या शिक्षकांना अनुदान मिळण्यासाठी आवश्यक संच मान्यतांसाठी विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड ची अट घालण्यात आलेली आहे ज्यामध्ये केवळ व्हॅलिड आधार कार्ड ही संख्या ग्राह्य धरण्यात येत असून इन वॅलेड आधार कार्ड ची संख्या ग्राह्य धरण्यात येत नाही वास्तविक पाहता त्या शाळेची पटसंख्या विद्यार्थी संख्या योग्य असताना देखील केवळ आधार कार्ड न झाल्याने विद्यार्थी संख्या कमी दाखवणे हा कुठला न्याय आहे कारण आधार कार्ड इन वॅलेट होणे ही तांत्रिक बाब असून शासनाने प्रत्यक्ष विद्यार्थी तपासावे पण शिक्षकांचे नुकसान करू नये असे सांगत या शिक्षकांना न्याय देण्याची मागणी केली याप्रसंगी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचे जळगाव जिल्हा अध्यक्ष राजेश जाधव सर निलेश वाघ सर साळुंखे सर उखर्डू चव्हाण सर वासुदेव चौधरी सर भगवान पाटील सर राजेश जाधव सर बावस्कर सर भाऊसाहेब सपकाळे सर तसेच बाविस्कर सर पाटील सर व जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व ज्येष्ठ शिक्षक व नगरसेवक उपस्थित होते