• Sun. Jul 6th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

ऐनपूर महाविद्यालयाचे प्रा. एम.के.सोनवणे यांना पीएच.डी.प्रदान.

Mar 24, 2023

Loading

ऐनपूर महाविद्यालयाचे प्रा. एम.के.सोनवणे यांना पीएच.डी.प्रदान.

ऐनपूर येथिल
सरदार वल्लभभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालय ऐनपूर ता.रावेर येथील मराठी विभागाचे प्रा.महेंद्र सोनवणे यांना क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून नुकतीच पीएचडी ही पदवी मिळाली आहे. त्यांच्या संशोधन विषय ‘प्रेमानंद गज्वी यांची नाटके : एक अभ्यास ‘असा होता. या संशोधन कार्यासाठी पाचोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष पाटील हे मार्गदर्शक म्हणून लाभले. प्रेमानंद गज्वी यांची जीवनसरणी आणि विचारसरणी ही बुद्धवादी, विज्ञानवादी आणि प्रामाण्यवादी अशी आहे. म्हणून त्यांच्यावर बुद्ध तत्त्वज्ञान आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा प्रभाव पडलेला आहे, असे संशोधकाने आपल्या शोध प्रबंधात मांडले आहे. जगविख्यात लेखक प्रेमानंद गज्वी यांनी आपल्या नाटकांमधून संत कबीर, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या तत्त्वज्ञानाच्या पुरेपूर वापर केला आहे. उभ्या महाराष्ट्राला प्रेमानंद गज्वी हे नाव ‘किरवंतकार’ आणि ‘घोटभर पाणी ‘या दोन साहित्य कृतीमुळे माहित आहे. त्यांनी सर्वणांमधील उपेक्षित, वंचित लोकांचे जीवन देखील चित्रित केलेले आहे. यातून धर्मचिकित्सा, अंधश्रद्धा, महात्मा फुलेंच्या सत्यधर्म अभिव्यक्त केला आहे. त्यांच्या दहा नाटकांच्या अभ्यास संशोधकांने केलेला आहे. संस्थेचे अध्यक्ष भागवत पाटील, चेअरमन श्रीराम पाटील, सचिव संजय पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी अंजने, सहकारी प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले असून सर्वांनी प्रा.एम.के सोनवणे यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed