
पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला स्पर्धेमध्ये कल्याण च्या वैष्णवी पाटील ची धडक !
कल्याण ( मनिलाल शिंपी ) कल्याण जवळील मांगरूळ गावची पैलवान म्हणून नावारूपास आलेली वैष्णवी दिलीप पाटील हिने सांगली येथे झालेल्या पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला असून सांगली मध्ये झालेल्या या स्पर्धेमधील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यामधील मांगरूळ या गावची सुकन्या पहिली महाराष्ट्र केसरी झाली आहे, कल्याणची पैलवान वैष्णवी पाटील ही जय बजरंग तालीम प्रशिक्षण केंद्र नांदिवली येथे प्रशिक्षक पंढरीनाथ ढोणे, वसंत साळुंखे ,सुभाष ढोणे, प्रज्वल ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारी तसेच लहानपणापासूनच कुस्तीची आवड आणि आतापर्यंत सहा ते सात राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजवणारी पैलवान वैष्णवी पाटील महाराष्ट्र केसरीच्या पहिल्या स्पर्धेमध्ये पोचली असून तिच्या कामगिरीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे,
वैष्णवी पाटील हिला वडील दिलीप पाटील आणि आई पुष्पा पाटील यांचे सहकार्य लाभल्यामुळे घरामधून पहिल्यापासूनच कुस्ती – पैलवानकीचा ओढा तिला लाभला होता आणि मुलीला राज्य राष्ट्रीय पातळी पर्यंत तसंच आंतरराष्ट्रीय पातळी पर्यंत आपल्या आई-वडिलांनी बाळगलेलं स्वप्न मला पूर्ण करायचे असून महाराष्ट्र केसरी ह्या स्पर्धेपर्यंतच मला न थांबता आंतरराष्ट्रीय आणि ऑलम्पिक पर्यंत मजल मारायचे आहे, असे वैष्णवी पाटील हिने दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना सागितले. तिच्या या यशस्वी वाटचालीला मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुप व स्वराज्य तोरण परिवार यांच्याकडून शुभेच्छा देऊन तिचे अभिनंदन करण्यात आले आहे . त्याचप्रमाणे संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून तसेच कल्याण डोंबिवली मधील सर्व क्रीडा संचालक, क्रीडा संघटक, आणि क्रीडा शिक्षकांकडून वैष्णवीचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.