
जळगाव येथील तथागत गौतम बुध्द व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे अनाधिकृत पणें पाडणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्या बाबत अमळनेर पोलीसांना निवेदन
दिनाक 16 मार्च रोजी पहाटे तीन वाजता पोलिस प्रशासनाची दिशाभूल करत जळगाव येथील रेडक्रास सोसायटी समोरील 1983 पासून स्थापन असलेल्या तथागत गौतम बुध्द व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे हटवण्याचे षडयंत्र केले , ह्या गैरकृत्या मुळे सर्व आंबेडकर जनतेच्या भावना अत्यंत तीव्र दुखावल्या असून अमळनेर लोक संघर्ष मोर्चा ने आरोपी प्रशांत देशपांडे व अमित पाटील यांना तात्काळ अटक करावी, व आरोपींनी केलेले कृत्य अत्यंत गंभीर असून पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याने कलम १२०(ब) ही लावण्यात यावे.या बाबत दिनाक १६ मार्च ते आज रोजी १० दिवस उलटूनही जळगाव पोलीस आरोपीला पकडू शकले नाहीत ही बाब अत्यंत खेदजनक असून गंभीर आहे, याबाबत विधान परिषदेत दोन वेळा चर्चा होवून व उपसभापतींनी आदेश देवून सुध्दा पोलीस यंत्रणा आरोपीला पकडू शकत नाही ह्या मुळे आमच्या सारख्या सामान्य लोकांना काय न्याय मिळेल असा प्रश्न उभा राहतो आणि जनतेच्या भावना संविधानाच्या चौकटीत तीव्र दुखावल्या असून कृपया आपण आरोपींना अटक करत आम्हाला न्याय द्यावा अथवा लोक संघर्ष मोर्चा कायदेशीर पध्दतीने आंदोलन करेल असे निवेदन आज रोजी लोक संघर्ष मोर्चा घ्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. अशोक पवार सर, नगरसेवक नरेंद्र भाऊ संदानशीव, संदीप घोरपडे, बन्सिलाल भागवत गुरूजी, पन्नालाल मावळे, योगेश बिर्हाडे, राजेंद्र संदानशिव, देविदास घोलप, भुरा पारधी, धनराज पारधी सह कार्यकर्त्यांनी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये पोलिस उपनिरीक्षक श्री विकास शिरोळे यांना दिले.