

घर खरेदीसाठी रेडीरेकनरचे दर
यावर्षी स्थीर.
घर खरेदी करायचे असेल तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या एक निर्णय आला आणि आता घर खरेदी करणे हे अत्यंत स्वस्त ठरणार आहे कारण शासनाचे जे रेडी रेकनर दर असतात त्यामध्ये शासनाने कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही यामुळे यावर्षी घर खरेदीला जोर येणार ची शक्यता आहे असे म्हटले जाते. राज्यातील रेडीरेकनरच्या दरात यावर्षी कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या रेडीरेकनर दराप्रमाणे, म्हणजे 2022-23 च्या रेडीरेकनर दराप्रमाणे घर खरेदी करता येणार आहे.
मुंबईतील घर खरेदी-विक्रीमुळे राज्याला 1,143 कोटी रुपयांचा महसूल मिळाला
मुंबई शहरात मार्च 2023 मध्ये 12,421 युनिट्सची मालमत्ता विक्री नोंदणी झाली, त्यामुळे राज्याच्या महसुलात 1,143 कोटी पेक्षा जास्त भर पडली. एकूण नोंदणीकृत मालमत्तांपैकी 84 टक्के निवासी तर 16 टक्के अनिवासी मालमत्ता होत्या. मार्च 2023 मध्ये 1,143 कोटी महसूल संकलनासह, मुंबईने एप्रिल 2022 पासून सर्वाधिक महसूल संकलन नोंद केल्याचं नाईट फ्रँक या अहवालात म्हटलं आहे.गुढी पाडवा, अक्षय तृतीया या मुहुर्तावर मोठ्या प्रमाणात घर खरेदी होत असते. बांधकाम साहित्याचे वाढलेले दर, वाहतूक खर्च, मजुरी यामध्ये भरपूर वाढ झाली आहे.परंतु रेडीरेकनर दर यावर्षी स्थीर ठेवल्याने बांधकाम व्यावसायिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
विरार मधील नागरिक अभय ठाकरे यांच्या मते मुंबईतील उपनगरातील घरे ही सर्व सामन्यांच्या आवाक्याबाहेर गेले असल्याने वसई, विरार व नालासोपारा हा एक चांगला पर्याय ग्राहकांना आता उपलब्ध झाला आहे. तर विजय महाजन यांनी कर्ज पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थानी आपले गृहकर्ज दर कमी केल्यास रियल इस्टेट व्यवसाय पुन्हा भरारी घेऊ शकतो असे म्हंटले आहे. तर हितेंद्र पंचाल यांनी केवळ महसुल वाढविण्यासाठी शासनाने रेडीरेकनरचे दर स्थिर ठेवल्याचे सांगितले. आजही घर घेणे सर्व सामान्यांना आवाक्यात नाही असे सांगितले.