• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

शिक्षक कर्मचाऱ्यांची पेंडिंग कामे त्वरित करा पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना खडेबोल

Jun 13, 2023

Loading

शिक्षकांची पेंडिंग कामे त्वरित करा पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना खडेबोल

आमदार सत्यजितदादा तांबे यांच्या उपस्थितीत सहविचार सभेमध्ये माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आज दिनांक 12 जून रोजी जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी पतपेढी जळगाव येथे नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजितदादा तांबे यांच्या उपस्थितीत माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संदर्भात डॉ नितीन बच्छाव साहेब माध्यमिक शिक्षणाधिकारी जि प जळगाव, उपशिक्षणाधिकारी शेख साहेब जिल्हा परिषद कार्यालयीन अधीक्षक माध्यमिक श्री वानखेडे साहेब भविष्य व वेतन निश्चिती अधीक्षक शर्मा साहेब लेखाधिकारी रायसिंग भादले, कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षण निरीक्षक श्रीमती दिपाली पाटील व माध्यमिक शिक्षण विभागातील सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सेक्रेटरी व जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष दादासाहेब श्री एस डी भिरुड सर मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब जे के पाटील सर शिक्षक नेते आप्पासाहेब संभाजी पाटील सर जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री एच जी इंगळे सर भाऊसाहेब आर एच बाविस्कर सर जळगाव जिल्हा जुनिअर कॉलेज संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा सुनील गरुड, कार्याध्यक्ष शैलेश राणे, विनाअनुदानित संघटनेचे प्रा अनिल परदेशी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध समस्यांचे निराकरण होण्यासाठी माध्यमिक शिक्षक संघ मुख्याध्यापक संघ व संलग्न संघटनांची सहविचार सभेसाठी विषय पत्रिकेप्रमाणे खालील विषयांवर चर्चा करण्यात आली यामध्ये जिल्हा परिषद कार्यालयातील विविध कामांबाबतची दप्तर दिरंगाई , कर्मचारी व अधिकारी यांच्या कार्यालयातील अनुपस्थिती बाबत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मान्यतेबाबतचे धोरणाबाबत व प्रलंबित प्रकरणांची माहिती मिळणेबाबत , मुख्याध्यापक व प्रभारी मुख्याध्यापक मान्यता व नियुक्ती बाबत , जिल्हा परिषद मधील सुनावण्यांचे निर्णय त्वरित देणे बाबत, सेवानिवृत्ती प्रकरणी वेळेवर न पाठवणे व मंजूर प्रकरणांना ना हरकत प्रमाणपत्र न देणे, पी एफ अंतिम देयक प्रस्ताव तीन महिने आधी स्वीकारून सेवानिवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी रक्कम मिळणे बाबत तसेच माहे मे मधील पीएफ बिलांबाबत ,पी एफ व डीसीपीएस च्या हिशोबाच्या स्लिपा मिळणेबाबत ,मृत कर्मचाऱ्यांचे ठेव विमा संलग्न प्रकरणे प्रलंबित असलेबाबत ,सातवा वेतन आयोग हप्ता न मिळणेबाबत ,प्रलंबित फरक दिले त्वरित मिळणेबाबत तसेच शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत होणे बाबत , रजा रोखीकरण देयके अद्यापही मंजूर न होणे बाबत
कनिष्ठ महाविद्यालयीन प्रश्नांसंदर्भात
अंशतः अनुदान तत्त्वावरील शाळांचे पगार दर महिन्याच्या एक तारखेला होणे बाबत,40 टक्के अनुदानावरील शिक्षकांना मेडिकल बिल देणेबाबत , आठ महिन्याचा थकीत वेतनाचा फरक मिळणे बाबत ,दोन तुकडी वरील शंभर टक्के अधिक वीस किंवा चाळीस टक्के तुकडीवरील एकाच विषयाचे पूर्णवेळ कार्यभार असलेल्या तासिका तत्त्वावरील कार्यभार शिक्षकांना एका शालार्थ वेतन प्रणालीतून वेतन करणे बाबत ,जिल्ह्यातील प्रलंबित शालार्थ आयडी मिळणे बाबत इत्यादी अनेक विषयांवर कार्यालयातील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी तसेच वेतन पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करून सकारात्मक समस्या सोडवण्याचे आश्वासन अधिकारी यांनी दिले या सभेसाठी साधना लोखंडे , श्री एन व्ही पाटील ,जे पी सपकाळे , डी पी साळुंखे, सिद्धेश्वर वाघुळदे ,नंदकुमार पाटील,मंगेश भोईटे, देवेंद्र पाटील ,अरुण सपकाळे , डी ए पाटील एस के पाटील , युवराज झोपे , डिगंबर पाटील , तुषार पाचपांडे , देवेंद्र फेगडे, सुनील महाजन , संजय राणे व जिल्हाभरातून विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed