• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

आमदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाला सरपंच पदाचा मान

Jun 14, 2023

Loading

आमदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाला सरपंच पदाचा मान
आमदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांना चालना देणार-सरपंच मयुरी पाटील

भडनेची लेक बनली झीरवेची सरपंच

शिंदखेडा प्रतिनिधी
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील माजी उपसरपंच रावसाहेब साहेबराव निकम यांची पुतनी व भाईदास साहेबराव निकम यांची मुलगी सौ मयुरी मनीष पाटील यांची शिदखेड्याचे पाणीदार आमदार माझी कॅबिनेट मंत्री आमदार जयकुमार भाऊ,रावल यांच्या मार्गदर्शनाखाली झीरवे ग्रामपंचायतच्या सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे जीरवे ग्रामस्थांतर्गत सत्कार करण्यात आला यावेळी पंचपदासाठी मयुरी मनीष पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याकारणाने यांची बिनविरोध निवड करण्यात आली मंडळ अधिकारी सुनिल कुवर तलाठी विशाल पाटील ग्रामसेवक सारिका गीते सर्जेराव पाटील देवमन पाटील संभाजी पाटील संदीप पाटील खंडू खैरनार नवल पाटील राहुल पाटील यांनी नवनिर्वाचित सरपंच मयूरी पाटील यांच्या सत्कार केला यावेळी आज झीरवे ग्रामपंचायत कार्यालयात दुपारी दोन वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी नवनिर्वाचित सरपंच मयुरी पाटील यांनी गावकऱ्यांनी दाखविलेला विश्वास व आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते पाणीदार आमदार जयकुमार भाऊराव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गावातील विकास कामांना चालना देईल तसेच स्वच्छ गाव शैक्षणिक सुविधा महिलांसाठी असलेल्या योजना गावातील समाजभिमुख उपक्रम तसेच शासकीय योजनांचा गावकऱ्यांना कसा लाभ जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू गावातील पाणी प्रश्न आरोग्य सुविधा तसेच एमआरजीएस अंतर्गत विहिरी शेत रस्ते अशा विविध शासकीय योजना आमदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे व गावकऱ्यांनी दाखविला विश्वासाला तडा न जाऊ देता विकास कामे खेचून आणण्यासाठी प्रयत्न करू असे मत नवनिर्वाचित सरपंच मयुरी मनीष पाटील यांनी सरकारला उत्तर देताना सांगितलेअसते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed