
बऱ्याच वर्षांनंतर आरोग्य सहाय्यीका (स्त्री स्वास्थ अभ्यंगता) चे प्रशिक्षण सुरू, पण कोणताही भत्ता नसल्याने मात्र प्रशिक्षणार्थी नाराज.
आज दिनांक-१४ जून २०२३ रोजी आरोग्य सहाय्यीका (स्त्री स्वास्थ अभ्यंगता) या प्रशिक्षणासाठीच्या आरोग्य सेविका यांच्या हक्का साठी पाठपुरावा केला.
आरोग्य विभागातील आरोग्य सेविका यांचे सहा महिन्यांचे आरोग्य सहाय्यीका (स्त्री स्वास्थ अभ्यंगता ) या प्रशिक्षणासाठी आरोग्य सेवा आयुक्तालय मार्फ़त दर वर्षी हे सहा महिन्यांच्या कालावधीमधील सेवा जेष्ठत्यानुसार आरोग्य सेविकांना दिले जाते व त्यानुसार त्या आरोग्य सहाय्यीका म्हणुन पदोन्नतीस पात्र ठरतात,
गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा स्तरावरून हे आरोग्य सहयिका (स्त्री स्वास्थ अभ्यंगता) चे प्रशिक्षण कोविड१९ कालखंडामुळे बंद होते, परंतु या २०२२-२०२३ वर्षी आरोग्य सेविका यांना ते जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दुसरी बॅच सध्या सुरू असुन,
आधीच्या बॅच मधील २५ महिला प्रशिक्षणार्थी व आत्ताच्या बॅच मधील २५, आशा सर्व प्रशिक्षणार्थीना आजतागायत, या सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधी व्यतिरिक्त कोणताही राहण्याच्या,जेवणाचा किंवा कोणताही प्रवास भत्ता देखील दिला गेलेला नाही, त्या सर्वांनी स्वखर्चाने त्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले,
म्हणून महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना२५७/८९ च्या जळगांव शाखेची मागणी असल्या कारणाने, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय देशमुख यांनी पदाधिकारी समवेत, गेल्या दोन महिन्या पासून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे, तथा जिल्हा प्रशिक्षण केंद्र प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार देशमुख यांना देखील या सर्व महिला प्रशिक्षणार्थींच्या अडचणी व तक्रारी समक्ष निदर्शनास आणून दिल्या आहेत, तरी देखील अजूनही कोणत्याही प्रकारची याबाबत कार्यवाही न झाल्याने शेवटी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किरण पाटील यांच्या कडे सर्व महिला आरोग्य सेविका प्रशिक्षणार्थीच्या व्यथा घेऊन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सह जिल्हा पदाधिकारी हे आज निवेदन सादर करण्यासाठी आले.
तसेच पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील ही सदरील बाब लक्षात यावी या साठी हे मागणीचे निवेदन घेऊन जिल्हा अध्यक्ष-विजय देशमुख व कार्याध्यक्ष-राजेश कुमावत, सचिव व्यवस्था-सुनील महाजन, समवेत यांनी मराजीप आरोग्य सेवा कर्मचारी२५७/८९ यांचे संघटने मार्फ़त आरोग्य सहयिका या प्रशिक्षणार्थीच्या प्रवास, निवास व जेवणाचा भत्ता त्वरित मिळणे बाबत निवेदन देण्यात आले.
तरी सर्व आरोग्य सहाय्यीका प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या महिला आरोग्य सेविका प्रशिक्षणर्थीना लवकरच न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे.