
राजर्षी शाहूमहाराज महाराज जयंतीनिमित्त कळमसरे हायस्कूल मध्ये व्याख्यान!!
भारतात प्रबोधनाच्या वैचारिक चळवळीस जनमानसात पोहचविण्यात सिंहाचा वाटा असलेले राजे शाहू महाराज यांची जयंती शारदा माध्यमिक विदयालयात साजरी झाली..युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर आयोजित 100 वक्ता तयार करून राजे शाहू महाराज यांच्या जयंतीस 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात शंभर शाळेत हे अभियान राबविले गेले.त्या धर्तीवर शारदा माध्यमिक विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयातील प्राचार्या कल्पना सिसोदिया यांनी भूषविले. शाहूं महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले. सुनिल गर्जे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक
केले.
कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांची भाषणे झाली. अभियानातील सक्रिय कार्यकर्ते तसेच पत्रकार
एस. एच. भवरे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला. राजर्षी च्या अनमोल जीवनातील प्रसंग सांगितले. सामाजिक न्यायाचा वापर प्रत्यक्ष समाजात रुजविणारा ,आरक्षणाचा जनक, शिक्षण प्रणेता, वस्ती गृह संस्थापक, सत्यशोधक, धर्म सुधारक अशा विविध पैलूंवर मांडणी केली.यानंतर शाळेचे पर्यवेक्षक डी.डी. जाधव यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर सोनवणे यांनी केले.तर आभार एम. आर. तडवी यांनी केले.