• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मितभाषी व्यक्तीमत्व ह.भ.प.वाल्मिक पाटील काळाच्या पडद्याआड…

Jun 26, 2023

Loading

ह.भ.प.वाल्मिक पाटील काळाच्या पडद्याआड…

कै ह .भ .प वाल्मीक महाराज…

महाराज आपण आज दिनांक २६ जुन ला धुळयाला दवाखान्यात आपल्यावर उपचार सुरू असतांना अचानक सोडून गेल्याने परिवारावर नव्हे तर नातेवाईक ,मित्रपरिवार यांच्यावर एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला.. अगोदर पासूनच आपण धार्मिक क्षेत्राला वाहून घेतले होते आपण तालुक्यात नव्हे तालुक्याच्या बाहेर कोणताही धार्मिक कार्यक्रम असो सुख व दुख्खात आपली आवर्जून त्या ठिकाणी उपस्थिती राहायची.. आपला प्रेमळ स्वभाव व आपण परिवारावर केलेले संस्कार हे खरोखरच वाखाण्याजोगे आहेत… आपणास दोन मुली,सुविधा, कावेरी,
मुलगा प्रकाश , मुलींना व मुलांला आपण ज्ञानाचे बाळकडू देऊन विद्याविभूषित केले मुलगा व मुली ,जावई, पत्नी ,नातवंडे असा आपला परिवार होता.. परिवारातील लोक आपल्यावर खूपच प्रेम करत होते व आपल्या स्वभावाचे सर्वच चाहते होते.. मला अनेक वेळा आपण भेटायचे, गप्पा मारायचे, मार्गदर्शन करायचे मी ते कधी विसरू शकत नाही… आपण नेहमी म्हणायचे सुविधा, कावेरी ,प्रकाशला आपण चांगल्या प्रकारे गणितात आवड निर्माण केली…
तोंड भरून कौतुक करायचे.. आज आपली अचानक निधनाची बातमी कळल्याने खूपच दुःख झाले.. ताईंचा स्वभावही अत्यंत गोड होता नेहमीच आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या होत्या.
तो हसरा चेहरा , नाही कोणाला दुःखवले,मनाचा तो भोळेपणा, कधी नाही केला मोठेपणा, उडुनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.” “आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहिल. भावपूर्ण श्रद्धांजली!”
💐💐💐💐
शोकाकुल
श्री आय आर महाजन परिवार अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *