• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

माजी संचालक डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचा भुसावल शिक्षक पतपेढी मध्ये सत्कार

Jun 27, 2023

Loading

माजी संचालक डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचा भुसावल शिक्षक पतपेढी मध्ये सत्कार

सन 2015 ते 2020 या काळात मुक्ताईनगर तालुक्यातून नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथील ज्येष्ठ शिक्षक तथा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर हे जळगाव जिल्हा पूर्व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पतपेढी भुसावलच्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून आलेले होते या पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी ही पंचवार्षिक निवडणूक होती परंतु लॉक डाऊनच्या कोरोना काळामुळे 2023 पर्यंत हा कार्यकाळ मिळाला नवनियुक्त संचालक मंडळांनी मागील संचालक मंडळांचा सत्कार निरोप समारंभ माध्यमिक शिक्षक पतपेढी भुसावल येथे नुकताच आयोजित केला होता याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पतपेढीचे नवनियुक्तं अध्यक्ष श्री गोपाळ पाटील होते तर याप्रसंगी उपाध्यक्ष श्री राजू लवांडे सरचिटणीस श्री विनोद पाटील खजिनदार श्री प्रशांत सोनवणे या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.नवीन संचालक मंडळांनी जुन्या संचालक मंडळांचा गुलाब बुके व शाल देऊन सत्कार केला याप्रसंगी पतपेढीचे माजी उपाध्यक्ष तथा संचालक डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचा नवनियुक्त संचालक श्री ज्ञानेश्वर मोझे यांनी गुलाब बुके व शाल देऊन सत्कार केला याप्रसंगी पतपेढीचे माजी अध्यक्ष श्री डी. ए. पाटील श्री ललितकुमार सुपे श्री शिरिष वाणी श्री एम. आर. चौधरी सौ. चौधरी मॅडम श्री प्रशांत नरवाडे श्री दीपक बारी श्री सुशीलकुमार झोपे श्री वाय.एन.झोपे श्री यशवंत महाजन तसेच पतपेढीचे व्यवस्थापक श्री प्रमोद पाटील श्री ईश्वर फलक सर्व कर्मचारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *