• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षकप्रीय आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्याकरिता ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथ. माध्यमीक तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ यांची घेतली भेट..

Jun 27, 2023

Loading

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षकप्रीय आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्याकरिता ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथ. माध्यमीक तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ यांची घेतली भेट.

दिनांक 26.06.2023 रोजी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षकप्रीय आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) मा. ललिता दहितुले मॅडम यांची भेट घेतली यावेळी नव्याने 20% अनुदानावर येणाऱ्या शाळांच्या अनुदान वितरीत कारण्याकरीता येणाऱ्या अडचणी आणि त्यावर कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात यावर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा केली, ठाणे जिल्ह्यातील एकही शिक्षक अनुदानापासून वंचित राहणार नाही याची परिपूर्ण काळजी घ्या आणि लवकरात लवकर अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुरु करण्याकरिता आदेश दिले. शिक्षक व शिक्षेकेतर बांधवांचे प्रलंबीत प्रश यावर चर्चा केली, यामध्ये बी जे टिळक हायस्कूल चे श्री. नितीन नाना पाटील सर यांचे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. श्री. पदमसिंह परदेशी सर यांचे निवडश्रेणी प्रस्तावास मंजुरी घेतली.
शिक्षणाधिकारी (प्राथ) मा. कारेकर साहेब यांची सदिच्छा भेट घेतली आणि प्राथमीक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना केल्या, त्याच बरोबर नव्याने 20% अनुदानावर येणाऱ्या शाळांच्या अनुदान वितरीत कारण्याकरीता लवकरात लवकर कारवाई करावी अश्या सूचना केल्या.
अंशत अनुदानावर असणाऱ्या 20%, 40% & 60% वरील शाळांचे मे चे वेतन निधी अभावी झाले नाहीत तरी देखील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला भेट देऊन एक महिण्याचा पगार आमच्या शिक्षकांना देऊन आम्हाला सहकार्य करावे या करीता संचालक मंडळासोबत मिटिंग करून सकारात्मक चर्चा केली व आपली विनंती त्याने मान्य केली त्यामुळे शिक्षकांना लवकरच वेतन मिळून दिलासा मिळणार आहे. सोबत ठाणे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मा. गणेश पाटील सर, सचिव मा. प्रवीण लोंढे सर, शशिकांत पाटील सर, मगर सर उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *