
कळमसरे येथील ह.भ.प.मुरलीधर चौधरी यांची केमिस्ट असोसिएशनच्या आमंत्रित सदस्य म्हणून निवड…
अमळनेर प्रतिनिधी-कळमसरे ता.अमळनेर येथील धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मितभाषी व्यक्तिमत्त्व व महाराष्ट्र माळी समाजाचे मा.अध्यक्ष ह.भ.प. मुरलीधर तुळशीराम चौधरी यांची नुकतीच आमंत्रित सदस्यपदी निवड करण्यात आली.
सविस्तर माहिती अशी कि
जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मा केमिस्ट भूषण सुनीलजी भंगाळे व सचीव अनिल झंवर
यांनी पत्राद्वारे ह.भ.प मुरलीधर चौधरी यांची निवड जिल्हा कार्यकारणी आमंत्रित सदस्य म्हणून सहाव्यांदा पुर्ननिवड केलेली आहे.त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अ.भा.माळी महासंघ व कळमसरे समाजबांधव व मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले.