• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

G20 परिषदे अंतर्गत घेण्यात आलेल्या भाषण प्रतियोगितेत सागर कोळीचा दुसरा क्रमांक..

Sep 9, 2023

Loading

G20 परिषदे अंतर्गत घेण्यात आलेल्या भाषण प्रतियोगितेत सागर कोळीचा दुसरा क्रमांक..

भारत सरकारद्वारे संपूर्ण देशामध्ये G20 परिषदे अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आकाशवाणी केंद्र जळगाव यांच्या मार्फत भाषण स्पर्धा जळगाव येथे दि.08 सप्टेंबर रोजी एम जे कॉलेज हॉल मध्ये संपन्न झाली. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातून विविध स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यात सागर सुकदेव कोळी याने भाषण स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून यश मिळविले आहे. त्याला स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र नेहरू युवा केंद्र जळगाव जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर सर, आकाशवाणी केंद्राचे संचालक ज्ञानेश्वर बोबडे सर,एम जे कॉलेज हिंदी विभागाचे प्राध्यापक विजय लोहार सर यांच्या हस्ते देण्यात आले. या स्पर्धेसाठी नेहरू युवा केंद्र युथ लीडर तेजस धनंजय पाटील यांचे मार्गदर्शन सागर ला लाभले. सागर हा नेहरू युवा केंद्र युवा मंडळाचा सक्रिय सदस्य आहे या सोबतच या आधी पण विविध भाषण स्पर्धा आणि काव्य वाचन स्पर्धेत सागरने यश मिळविले आहे. साहित्यिक क्षेत्रात नवोदित तरुण म्हणून त्याची ओळख जिल्ह्यात निर्माण होत आहे. सागर कोळी यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *