• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

शेठ ला.ना. सा.विद्यालयात अध्यापक प्रबोधिनी उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी व्याख्यानाचे प्रथम पुष्प गुंफले(शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आईची भूमिका पार पाडावी:प्राचार्य.डॉ.श्री.अनिल झोपे सर यांचे प्रतिपादन

Sep 9, 2023

Loading

शेठ ला.ना. सा.विद्यालयात अध्यापक प्रबोधिनी उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी व्याख्यानाचे प्रथम पुष्प गुंफले(शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आईची भूमिका पार पाडावी:प्राचार्य.डॉ.श्री.अनिल झोपे सर यांचे प्रतिपादन

जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना. सा.विद्यालयात शनिवार दिनांक 9 सप्टेंबर 23रोजी सकाळी 9 वाजता कै.भैय्यासाहेब गंधे सभागृहात अध्यापक प्रबोधिनी उपक्रमाचा शुभारंभ कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण
संस्था,जळगांव चे प्राचार्य डॉ. श्री.अनिल झोपे सर तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष व शि. प्र.मंडळाचे ज्येष्ठ संचालक प्रा. श्री.शरदचंद्र छापेकर समन्वयिका सौ.लता छापेकर ,श्रीमती रजनी पाठक,शाळेचे मुख्याध्यापक श्री दुर्गादास मोरे व संस्था संचलित शाळांचे मुख्याध्यापक आदींच्या उपस्थितीत दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आला.या प्रसंगी संपदा छापेकर यांनी ज्ञानगीत सादर केले तर मुख्याध्यापक श्री.दुर्गादास मोरे सर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रम आयोजनाची भूमिका स्पष्ट केली.या वेळेस प्रमुख अतिथी प्रा.डॉ.श्री.अनिल झोपे सर यांचा परिचय जेष्ठ शिक्षिका श्रीमती राजश्री कुलकर्णी यांनी करून दिला तर त्यांचे स्वागत संस्थेचे जेष्ठ संचालक तथा विद्या समिती प्रमुख प्रा.शरदचंद्र छापेकर यांचे हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून करण्यात आले तर प्रा. छापेकर सर यांचे स्वागत मुख्याध्यापक श्री दुर्गादास मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.श्री.शरदचंद्र छापेकर सर यांनी अध्यापक प्रबोधिनी उपक्रमाचे हेतू व उद्दिष्ट स्पष्ट करून अध्यापक प्रबोधिनी मार्फत शिक्षकांच्या विकासासाठी घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली व शिक्षकांनी काळानुरूप बदल स्वीकारून ,अध्यापनाची विविध तंत्रे आत्मसात करून आपल्या विद्यार्थ्यास चांगला व जबाबदार नागरिक घडविण्याचे आव्हान केले.या वेळेस प्रमुख अतिथी डायट संस्थेचे प्राचार्य .डॉ. अनिल झोपे यांनी “नवीन शैक्षणिक धोरण -2020” त्यातील हेतू ,तत्व व राबवायचे विविध उपक्रम याबाबत एल .सी. डी.प्रोजेक्टर द्वारे सविस्तर विवेचन सादर करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आईची भूमिका पार पाडून स्वावलंबी जबाबदार नागरिक घडविण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संजय वानखेडे यांनी तर आभाप्रदर्शन सौ.सविता दातार यांनी केले व संपदा छापेकर यांनी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली.या वेळेस शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाळांतील शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *