अमळनेरला पत्रकाराच्या प्रामाणिकपणाचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी केले कौतुक…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आजही समाजामध्ये प्रामाणिकपणा जिवंत आहे. प्रामाणिकपणाचे बाळकडू हे आपल्या आई वडिलांकडून आपल्या मिळालेले असतात ..असाच अमळनेर येथे पत्रकार हितेश बडगुजर याला महागडा मोबाईल व काही कागदपत्रे सापडल्याने त्याने तात्काळ पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या टीम कडे सुपूर्द केल्यानंतर ज्या व्यक्तीचा हरवला आहे त्याच्याकडेच पोलीस निरीक्षक यांनी सुपूर्त केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला..
सविस्तर माहिती अशी कि अमळनेर शहरात दिनांक १०-०९-२०२३ रोजी अटकाव साप्ताहिकाचे संपादक श्री. हितेश बडगुजर यांना ओप्पो कंपनीचा अंदाजे किंमत १५००० रुपये किमतीचा मोबाईल सापडला. तो त्यांनी मा. पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे साहेब यांच्याकडे जमा करून सदरील मोबाईल धारक मालकाला समक्ष बोलवून त्यास परत मोबाईल भेटल्याने त्या मोबाईल धारक मालकाने श्री. विजय शिंदे साहेब व पत्रकार श्री. हितेश बडगुजर यांचे धन्यवाद करून आभार मानले. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य पाहून सर्व जमलेल्या व्यक्तींनी देखील चांगल्या कामाची पोच दिली.यावेळी पोलिस कर्मचारी उपस्थित होते.ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ बडगुजर यांचा हितेश बडगुजर हा चिरंजीव आहे.