शिक्षक-पदवीधर मतदारसंघात नोंदणीला ऑनलाईन चा पर्याय द्या
भाजपाचे अनिल बोरनारे व धनराज विसपुते यांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई,ठाणे (मनिलाल शिंपी) विधान परिषदेच्या जूनमध्ये होणाऱ्या मुंबई शिक्षक व पदवीधर, कोकण पदवीधर तसेच नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी लवकरच मतदार नोंदणी सुरू होणार असून मतदार नोंदणीचा टक्का वाढविण्यासाठी ऑनलाईन नोंदणीचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक व प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे तसेच भाजपा पदवीधर प्रकोष्ठचे राज्य संयोजक धनराज विसपुते यांनी केली आहे
याबाबत अनिल बोरनारे व धनराज विसपुते यांनी दिल्ली येथील केंद्रीय निवडणूक आयोगाला लेखी निवेदन दिले आहे
राज्यात जानेवारीमध्ये झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी धनराज विसपुते यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती विसपुते यांच्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय देत ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत आयोगाला आदेश दिले होते आयोगाने पण पर्याय उपलब्ध करून दिल्याने नोंदणी वाढून मतदानाचा टक्का वाढला होता. सध्याची मतदार नोंदणी प्रक्रिया ही अत्यंत किचकट आहे.तरी ऑनलाईन पद्धतीने पदवीधर मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे.याची दखल घ्यावी अशी मागणी अनिल बोरनारे यांनी केली आहे.