• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत राजेश सोनवणे सुवर्ण पदक मिळवून राज्यात प्रथम.

Nov 2, 2023

Loading

राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत राजेश सोनवणे सुवर्ण पदक मिळवून राज्यात प्रथम.
धुळे जिल्ह्यातील वार कुंडाने गावातील सुपूत्र राजू सोनवणे यांची राज्यस्तरीय योगस्पर्धेत चमक. नागपूर ( मनिलाल शिंपी) योगा फाऊंडेशन संचालित महाराष्ट्र योग शिक्षक संघ यांच्या वतीने दिनांक 28 व 29 ऑक्टोबर 2023 रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत श्री राजेश सोनवणे यांनी 41 वर्षे वरील पुरुष वयोगटात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक, मानचिन्ह व रोख रक्कम मिळवून घवघवीत यश प्राप्त केले व समाजातील तरुण पिढीला योग व प्राणायाम विषयी जागरूकता निर्माण केली. तसेच 41 वर्षे वरील महिला गटात प्रथम क्रमांक ठाणे येथील मीना घनवट, द्वितीय क्रमांक अपर्णा पाल व तृतीय क्रमांक सौ मनीषा चौधरी धुळे यांनी पटकावला.

योगासन स्पर्धेची पहिली फेरी ऑनलाइन पद्धतीने दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हास्तरीय झाली. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून 28 जिल्हा मधून 41 वर्षावरील वयोगटातील 152 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यातून प्रत्येक जिल्ह्यातून 10 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.

अंतिम फेरी दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी डॉ. हेडगेवार भवन नागपूर येथे पार पडली. त्यामध्ये राजेश विष्णु सोनवणे यांनी 41 वर्षा पुढील वयोगटात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक व अभिनंदन होत आहे. त्यांना योग विद्या धाम धुळे येथील डॉ. गंगाधर बारचे सर, डॉ. जितेंद्र भामरे, ठाणे येथील मीना घनवट व ईतर योग गुरूंचे मार्गदर्शन लाभले.

राजेश सोनवणे यांचे मूळ गाव धुळे तालुक्यातील वार ( कुंडाणे) आहे. ते जिल्हा न्यायालय धुळे येथे गेल्या 20 वर्षापासून नोकरी करीत आहेत. नोकरी सांभाळून त्यांनी योगासन स्पर्धेत मजल मारली आहे. श्री राजेश सोनवणे यांनी योग विद्या धाम धुळे येथून योग शिक्षक हा डिप्लोमा 2016 मध्ये पास केला आहे व महाराष्ट्र राज्य पंच परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तसेच योग शिक्षक म्हणुन गेल्या 8 वर्षा पासुन निःशुल्क सेवा देत आहेत. तसेच त्यांनी आयुष्यभर योगाचे मोफत ज्ञान देण्याचा संकल्प केला आहे. त्यांनी आजच्या तरुण पिढीचे आरोग्य अबाधित ठेवण्याचा मानस ठेवला आहे.राजू सोनवणे यांना मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.मनिलाल शिंपी,दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे, स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ दिनेश भाई ठक्कर, समाजसेवक उद्योजक डॉ.किशोर अढळकर, यांच्याकडून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *