अमळनेर प्रतिनिधी : शैक्षणिक व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मितभाषी अभ्यासू व्यक्तिमत्व वृद्धपकाळाने हरपले..अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील माजी सरपंच व शिक्षणोत्तेजक शिक्षण मंडळाचे चेअरमन नारायण लोटन कोळी वय ८६ यांचे २ रोजी दुपारी १२ वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा ३ रोजी सकाळी ११ वाजता मांडळ येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ,तीन मुले ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे. ते नरेंद्र , तनेश व केवल कोळी यांचे वडील होत. अमळनेर तालुक्यातील शैक्षणिक ,सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच मांडळ हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे संचालक मंडळ यांनी शोक व्यक्त केला आहे..
