डॉ.अमिता सरवदे यांना उद्यम हिरकणी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
दिनांक: १६.११.२०२३ रोजी वार गुरूवार छत्रपती संभाजीनगर येथील उद्मम इन्फो सोल्यूशनच्या वतीने डॉ.अमिता भिमराव सरवदे यांना “बिझनेस एक्सलन्स” राज्यस्तरीय उद्मम हिरकणी पुरस्कार सन्मानित करण्यात आले.बलवंत वाचनालयातील जितेंद्र काबरा सभागृहात झालेल्या या समारंभात ‘एमएसएमइ’चे संचालक एन.एन.इगेंवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी उद्योजिका सुनिता राठी ,मोहिनी केळकर , उल्हास भाले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वराज्य देशा संचालक मुरलीधर बेडगे, रुपाली पाटील,विशाखा रुपल ,मनिषा बेडगे, शिवाजी बेडगे, व्यंकट होनाळे, रामसिंग सलामपुरे निलेश कासार, गोपाळ हालसे इतर सर्वांनी अभिनंदन केले.
