• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

ग्रामपंचायत टोळी येथे सविंधान दिवस साजरा

Nov 26, 2023

Loading

ग्रामपंचायत टोळी येथे सविंधान दिवस साजरा

पारोळा (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताला संविधान समर्पित केले त्यानुसार लोकशाही व प्रशासकीय बाबतीत देशाचे कार्य सविंधानानुसार चालु आहे तसेच विविध घटकातील मागासलेल्या जाती जमातींना सन 1950 पासुन आरक्षण लागु करण्यात आले त्यामुळे भारतातील तमाम नागरिक व महिला त्यांना आरक्षणाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे साहेब आहेत असे म्हटले जाते विशेषता सविंधानामुळे लोकशाही व लोकसेवकांना अधिक महत्व प्राप्त आले, त्यांच्या अप्रतिम कार्य पद्धतीला देशातील तमाम जनसागराकडून कलीयुगात देवरूपी माणुस समजले जाते त्यांच्या संविधानातील कायदे कलमांची विविध क्षेत्रात कडक अंमलबजावणी करून देश कृषीप्रधान होऊन प्रगतीच्या मार्गावर आहे यानुसार शासन व प्रशासन प्रती मंत्रालयपासुन ते विविध प्रशासकीय कार्यालयाच्या ठिकाणी दिनांक 26 नोव्हेबर रोजी संविधान दिवस साजरा करणेबाबत शासन निर्णायक परिपत्रके वेळोवेळी घोषित केलेली आहेत त्यानुसार दिनांक 26 नोव्हेबर 2023 रोजी टोळी ग्रामपंचायत येथे सविंधानाचे वाचन करून संविधान दिवस साजरा करण्यात आला संविधान वाचन करतांना माजी सरपंच डॉ. राजेंद्र पाटील ग्रामसेवक अनिल मोतीराळे ग्रामरोजगार सेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे संतोष आबा प्रविण पाटील किशोर पाटील तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, कर्मचारी वृंद तसेच गावातील नागरिक बहुसंख्य संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *