• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

प्रोटॉन जिल्हास्तरीय अधिवेशन व पुरस्कार सोहळा सम्पन्न

Nov 27, 2023

Loading

प्रोटॉन जिल्हास्तरीय अधिवेशन व पुरस्कार सोहळा सम्पन्न

दि २७ नोव्हेंबर २०२३ रोजी अल्प बचत भवन जळगाव येथे संपन्न झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पी.एस. एम एस स्कुल व ज्युनि कॉलेज बामनोद येथील शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व लेखक,पत्रकार,व्याख्याता प्रोटान संघटनेचे महाराष्ट्र् राज्य उपाध्यक्ष मा.गणेश काकडे यांनी स्वीकारले. तसेच कार्यक्रमाचे उदघाटक माजी शिक्षणाधिकारी लेखक व्याख्याता मा.शशिकांत हिंगोणेकर साहेब यांनी उदघाटन केले उदघाटन करताना यांनी प्रोटॉन संघटनेच्या कार्याचे कौतुक केले.कार्यक्रमाला ग स सोसायटीचे संचालक व विस्तार अधिकारी मा विजय पवार साहेब व विस्तार अधिकारी मा जे डी पाटील साहेब.माध्यमिक पतपेढी जळगाव व भुसावल येथील माजी संचालक मा पी एस सोनवणे सर भुसावल पतपेढीचे संचालक टी टी सोनवणे सर राजेश वाढेकर यांनी उपस्थिती दिली
अधिवेशनात नवीन शैक्षणिक धोरणावर प्रा प्रकाश कांबळे यांनी विस्तरीत पणे आपले मत व्यक्त केले.नवीन शैक्षणिक धोरन२०२० मध्ये खाजगिकरणास वाव देण्याचे काम शासनाच्या माध्यमातून होत असल्याचे सांगितले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.गणेश काकडे यांनी आपल्या भाषणात नवीन शैक्षणिक धोरण २०२० व नवीन पेन्शन योजनेवर बोलताना नवीन पेन्शन योजना ही खात्रीशीर पेन्शन नाही.नवीन पेन्शन योजने मुळे कर्मचारी हा म्हातारा पणात लाचारीचे जीवन जगेल त्याला मिळणाऱ्या पेन्शन मध्ये त्याची उपजीविका सुद्धा भागवता येणार येणार नाही.त्यामुळे नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सर्व लोकांनी एकत्र आले पाहिजे तुकड्या तुकड्या मध्ये लढण्यात कुणाला काही मिळणार नाही
तसेच राजकीय लोकांनी निर्माण केलेल्या संघटनेत काम करणे म्हणजे वेळ बुद्धी आणि पैसे वाया घालविणे आहे राजकीय संघटना आपल्या मतांवर सत्ता प्रस्थापित करतात ते आपला कधीच विचार करीत नाही म्हणून आम्ही हुशार झाले पाहिजे आपण लोकशाहीचा वापर करून जनशक्ती निर्माण करून ताकद दाखवली पाहिजे तेव्हा आपल्याला जुनी पेन्शन मिळण्याची शक्यता आहे मात्र राजकीय लोक आपल्याला न्याय देणार नाहीं असे माझे ठाम मत आहे प्रोटान संघटना राजकारण विरहित ताकद निर्माण करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करेल त्यासाठी आपण सर्वांनी प्रोटॉन संघटनेची ताकद वाढवावी देशात खाजगिकरणास विरोध करण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून केले जात आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण चव्हाण सर यांनी केले तर प्रस्तावना प्रोटॉन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद भालेराव यांनी केली कार्यक्रम यशस्वी होण्या करिता मिलिंद निकम संजय अंदुरकर राजेश वाडेकर भूषण घुगे मनोज तायडे दत्तप्रसाद सुरवाडे महिंद्रा तायडे दीपक तायडे यांनी सहकार्य केले तर शिक्षण विभागातील विविध शिक्षक संघटनेतील पदाधिकारी यांनी कार्यक्रमास उपस्थिती दिली
अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार व माता सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन खालील शिक्षकांना गौरविण्यात आले
शहर जळगाव शहर धनराज पुंडलिक भारुडे नूतन मराठा विद्यालय जळगाव परविन धनगर सर विद्यालय जळगाव सौ वर्षा आबासाहेब अहिरराव यादे पाटील माध्यमिक विद्यालय मेहरून श्री बापू श्रावण साळुंखे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरनार सौरत्नमाला पंढरीनाथ सुरवाडे उपशिक्षिका जिल्हा परिषद शाळा पारधी तर भुसावळ तालुक्यातून हरीश कुमार पाने वरिष्ठ शिल्प निर्देशक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भुसावळ चाळीसगाव तालुक्यातून श्री संदीप अहिरे जि प प्राथमीक शाळा तमगाव प्राध्यापक संजय शिवराम राठोड प्राचार्य कनिष्ठ महाविद्यालय पिंपळखेड तालुका चाळीसगाव श्री बापूराव आनंदराव पाटील कैलासवासी ना जी पाटील प्राथमिक विद्यालय अमळनेर प्रमिला विठ्ठल मोरे दीप केंद्र शाळा सावखेडा मुना प्रेमान तळवी शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरा डॉक्टर अतुल संतोष सूर्यवंशी एम एम एस कॉलेज पाचोरा साहेबराव चौधरी जि प शाळा तालुका रावेर प्राध्यापक प्रभाकर भास्कर इंगळे उपशिक्षक नूतन माध्यमिक विद्यालय चिनावल श्री किशोर नामदेव चव्हाण प्राथमिक शाळा जिल्हा परिषद सौ स्वाती प्रकाश झोपे प्राथमिक शाळा ख्रिडी मा.रतन भगवान भोई ए पी राणे विद्यालय खिर्डी सौ मंदाकिनी नद किशोर भारुडे नूतन ज्ञानमंदिर विद्यालय अडावद श्रीमती खगेश्वरी टीकाराम वाघोदे भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालय पाळधी संजय सुकलाल महाजन नांदेड इंग्लिश स्कूल नांदेड लक्ष्मण प्रभाकर पाटील गुड शेफर्ड इंग्लिश मीडियम धरणगाव राजू चंद्रसिंग लोडते ्रीमती रत्‍नाबाई सुरेश जैन माध्यमिक विद्यालय तोंडापूर सौ संगीता नामदेव इंगळे जि प प्राथमीक शाळा नेरी रंजीत रामदास सोनवणे आगर गरुड माध्यमिक विद्यालय शेंदुर्णी सौ प्रतिभा नाशिकेत नरवाडे न्यू इंग्लिश स्कूल जामनेर श्री निलेश धर्मराज पाटील जि प शाळा थोरगवण राजू पंडित चिमणकर अध चौधरी माध्यमिक विद्यालय डोंगरकठोरा नितीन बारी साने गुरुजी माध्यमिक विद्यालय यावल किशोर कुमार उत्तमराव पाटील श्री दत्त हायस्कूल चिखली अश्फाक अली मुस्ताक अली अंजुमन उर्दू हायस्कूल साखळी श्री किशोर गोविंदा शिंपी अनुदानित आदिवासी आश्रम शाळा गुढे परशुराम हरचंद महाजन प्राथमिक शाळा हिंदळे मनोहर साहेबराव सौदाणे पद्मालय उच्च माध्यमिक विद्यालय एरंडोल संतोष लक्ष्मण खोंदले जि प शाळा चिखली महेंद्र देवराम तायडे ज्ञानगंगा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय इच्छापुर रवींद्र भरत पाटील माध्यमिक आश्रम शाळा वसंत नगर बोदवड राजाराम संतोष धनगर रेणुका देवी माध्यमिक विद्यालय बोदवड सुनील बाबुराव माळी जि प शाळा जामठी यांना पुरस्काराने गौरविण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *