

अण्णासाहेब जे के पाटील सर यांचे शिक्षणक्षेत्रात मोठे योगदान
आमदार सत्यजितदादा तांबे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई व जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री जे के पाटील सर हे नुकतेच प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक 30/11/ 2023 रोजी सेवानिवृत्त झाले त्यानिमित्ताने जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील सर्व शैक्षणिक संघटनांच्या वतीने त्यांचा सेवापुर्ती नागरिक सत्कार समारंभ गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज नॅशनल हायवे एम आय डी सी परिसर जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री आप्पासाहेब निळकंठ गायकवाड माजी प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव हे होते सर्वप्रथम सरस्वती पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले प्रास्ताविक शिक्षकनेते संभाजीअप्पा पाटील यांनी केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद सदस्य नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ माननीय आमदार श्री किशोर भाऊ दराडे, विधान परिषद सदस्य माननीय आमदार श्री सत्यजित दादा तांबे नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ ,गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ केतकीताई पाटील, शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प. जळगाव मा डॉ किरण कुंवर मॅडम, प्राथमिक शिक्षणाधिकारी मा विकास पाटील व माजी उपशिक्षणाधिकारी ठोसरे साहेब , जळगाव जिल्हा शिक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष श्री यु यू दादा पाटील, आयोजक दादासाहेब श्री एस डी भिरुड अध्यक्ष जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी, भाउसाहेब श्री आर एच बाविस्कर माजी अध्यक्ष जळगाव माध्यमिक पतपेढी , श्री एच जी इंगळे सर जिल्हाध्यक्ष जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ ,मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष यू डी पाटील , जुक्टो संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक प्रा सुनील गरुड, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे मा योगेश भोईटे, श्री डिगंबर पाटील , संदीप डोलारे तसेच उपशिक्षणाधिकारी मा रागिणी चव्हाण,उपशिक्षणाधिकारी पठाण साहेब, शिक्षण उपनिरीक्षक दिपाली पाटील, पारोळा गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, जि.प कार्यालय अधीक्षक किशोर वानखेडे, प्रतिभा सुर्वे ,शिक्षक संघटनेचे सी के पाटील , श्री नाना पाटील तसेच माध्यमिक शिक्षक पतपेढीचे सर्व संचालक मान्यवर म्हणून उपस्थित होते. सर्वप्रथम सर्व शिक्षक शिक्षकेतर व कनिष्ठ प्राध्यापकांच्या वतीने शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह व शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन मान्यवरांच्या हस्ते सपत्निक नागरी सत्कार करण्यात आला. त्यानंतर विधान परिषद .सदस्यआमदार सत्यजित तांबे यांनी श्री जे के पाटील सर यांच्या शिक्षण क्षेत्रातल्या कामाबद्दलचे गौरवोदगार काढले . अभ्यासू वृत्ती व मन मिळावूपणा यामुळे शिक्षक , मुख्याध्यापक, संस्था चालक या क्षेत्रामध्ये त्यांनी सेवा बजावत असताना अत्यंत प्रामाणिकपणे व अभ्यासपूर्वक नियोजन करून शिक्षणाच्या समस्या सोडवण्यासाठी जे योगदान दिलं त्यातून त्यांचं कर्म दिसत असून या निस्वार्थी सेवेमुळे त्यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्याध्यापक संघापर्यंत वाटचाल पूर्ण झाली असे गौरवउद्गार आमदार सत्यजित तांबे यांनी काढले त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी जे के अण्णांच्या शिक्षण क्षेत्रातील अभ्यासपूर्ण मांडणीमुळेच सातत्याने प्रशासनामध्ये त्यांची मदत शिक्षण क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांना होत असते राज्यस्तरावरती त्यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केल आहे त्यानंतर शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी जे के अण्णांच्या कामाला समस्त शिक्षण समाज मान्यता देऊन अण्णांच्या नेतृत्वाचा स्वीकार केला अशी भावना व्यक्त केली त्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ किरण कुंवर मॅडम यांनी जे के पाटील सर यांचा शिक्षण क्षेत्राच्या बरोबरच विज्ञानवादी दृष्टिकोन मनात जोपासून जिल्ह्यातील विज्ञानवादी विद्यार्थी चळवळीला बळ द्यावे असे आग्रहाचे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणातून सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी नीलकंठ गायकवाड यांनी मुख्याध्यापक संघाचे जे के पाटील यांच्या कौटुंबिक तसेच शिक्षण क्षेत्रातल्या असणाऱ्या योगदानाबद्दल अतिशय सुंदर अशा भावना आपल्या मनोगतनातून व्यक्त केल्या या कार्यक्रमाचे आयोजन श्री एस डी भिरुड , भाउसाहेब श्री आर एच बाविस्कर, संभाजीअप्पा पाटील, श्री एच जी इंगळे सर, यु यु दादा पाटील डिगंबर पाटील, कनिष्ठ प्राध्यापक संघटना व शिक्षकेतर संघटना समन्वयातून केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी कलाध्यापक संघटनेचे श्री एन ओ चौधरी श्री अरुण सपकाळे, भुसावळ पतपेढीचे माजी चेअरमन डी ए पाटील, प्रयोगशाळा संघटनेचे सिद्धेश्वर वाघुळदे,भुसावळ पतपेढीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, गोपाळ महाजन,माध्यमिक शिक्षक पतपेढीचे जे. पी सपकाळे व सर्व संचालक व शिक्षक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत वाघ जनता हायस्कूल नेरी यांनी केले तर आभार शैलेश राणे कार्याध्यक्ष जळगाव जिल्हा ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटना यांनी मानले.