• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

आंतरराष्ट्रीय धावपटू गिनिज रेकॉर्ड धारक क्रांती साळवी(शिंदे) यांची प्रताप तत्वज्ञान केंद्राला भेट..

Jan 17, 2024

Loading

आंतरराष्ट्रीय धावपटू गिनिज रेकॉर्ड धारक क्रांती साळवी(शिंदे) यांची प्रताप तत्वज्ञान केंद्राला भेट..
अमळनेर प्रतिनिधी
“जगविख्यात असलेल्या अमळनेरच्या प्रताप तत्वज्ञान केंद्राच्या ग्रंथालयात प्राचीन ग्रंथालयात अद्वैत तत्वज्ञानावरील दुर्मिळ ग्रंथ पाहून मला सुखद आश्चर्याचा धक्का बसला.ज्ञानाचा अनमोल ठेवा याठिकाणी आहे विदेशातील लोक येथे येऊन माहिती जाणून घेतात. ज्ञानाचा अनमोल ठेवा येथे आहे, त्याचा दरवळ जाणकारांना आहेच तथापी याचा लाभ अभ्यासकांनी जरूर घ्यावा.” अशी प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय धावपटू गिनिज रेकॉर्ड धारक क्रांती साळवी(शिंदे) यांनी व्यक्त केली.
अमळनेर येथील जगविख्यात असलेल्या प्रताप तत्वज्ञान केंद्रास त्यांनी भेट दिली असता सदर प्रतिक्रिया व्यक्त केली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या या वास्तुस भेट देऊन तेथील सखोल माहिती जाणून घेतली. सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या असलेल्या या ग्रंथालयातील काही पुस्तके पाहिली व कुतूहल व्यक्त केले.शेतकऱयांना माती आणि पाणी परीक्षणासाठी उपयुक्त असलेल्या प्रयोगशाळा पाहिली यावेळी लॅब टेक्निशीयन.सुवर्णा रायगडे यांनी माहिती दिली.
तदपूर्वी तत्वज्ञान केंद्राचे मानद संचालक प्रा.डॉ.दिलीप भावसार ,कार्यलय प्रमुख रोहिदास साळुंके,ग्रंथालय प्रमुख पंडित नाईक यांनी क्रांती साळवी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी आदित्य भारद्वाज, मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *