
पुण्यश्लोक काव्यसंग्रह राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
फलटण . : साहित्यप्रेमी सेवाभावी फौंडेशन, फलटण यांच्यावतीने फलटण येथे आयोजित ५ वे राज्यस्तरीय पर्यावरणस्नेही युवा स्पंदन साहित्य संमेलनामध्ये पुण्यश्लोक या संपादित काव्यसंग्रहास राज्यस्तरीय माणगंगा साहित्यप्रेमी पुरस्काराने गौरविण्यात आले. संमेलनाध्यक्ष प्राचार्य रवींद्र येवले, प्रमुख पाहुणे वन परिक्षेत्र अधिकारी दिगंबर जाधव,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ , ज्येष्ठ कवी प्रदीप कांबळे, माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, स्वागताध्यक्ष सुगम शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुण्यश्लोक काव्यसंग्रह प्रकाशित करून साहित्य विश्वात नवीन दालन वाचकांसाठी खुले करून दिले आहे. काव्यसंग्रह हा नवकवी, वाचक यांना नव्या आशेने जगण्याची व इतरांना जगविण्याची प्रेरणा देतो. ही बाब कौतुकास्पद आहे. आपणाकडून अशा अनेक नवनवीन साहित्यकृती निर्माण होवून समाजप्रबोधन व समाजहित घडावे . या उद्देशाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे प्रेरणादायी व चिरंतन स्मरण करून देणारे कार्य महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश येथील एकशे सदोतीस कवी यांच्या विविध प्रकारच्या काव्य रचनांचा संपादित पुण्यश्लोक काव्यसंग्रह पल्लवी मारकड अजित जाधव व ज तु गार्डे यांनी संपादित केला आहे.
पुण्यश्लोक काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल जेष्ठ साहित्यीक सुरेश शिंदे , सौ साधना गावडे , सौ सुचेता हाडंबर, सौ रोहिणी रासकर ,अनिल कुदळे , मधुकर गिलबिले, अरविंद खैरनार यांनी अभिनंदन केले.विविध स्तरातून पुण्यश्लोक काव्यसंग्रह संपादक कवी व शुभचिंतकांचे अभिनंदन केले जात आहे.
फोटो खाली : पुरस्कार प्रदान करताना रवींद्र बेडकिहाळ, ताराचंद्र आवळे ,रवींद्र येवले प्रमोद कांबळे सुरेश शिंदे व आनंदा ननावरे ,अजित जाधव