• Sat. Jul 5th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

ज्ञानदेव हांडे यांना मुंबई शिक्षक मतदार संघाची उमेदवारी जाहीर

Feb 21, 2024

Loading

ज्ञानदेव हांडे यांना मुंबई शिक्षक मतदार संघाची उमेदवारी जाहीर

मुंबई | प्रतिनिधी : घाटकोपर येथील सावते विद्यालयात जून 1999 पासून विनाअनुदान तत्वावर कार्यरत असलेले , महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे हे शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढणारा शिक्षक हा आगामी मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणुन उमेदवारी राज्य अध्यक्ष मनिष गावंडे यांनी नुकतीच उमेदवारी जाहीर केली.
विनाअनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांसाठी अनुदानाचा लढा राज्यभर उभा केला. शैक्षणिक वर्ष 2010 – 11 मध्ये 100 टक्के अनुदानावर शाळा घोषित होऊनही निधी अभावी प्रत्यक्ष वेतन सुरू उच्चस्तरीय पाठपुरावा केला. परंतु निधीच्या कमतरतेमुळे तीन-तीन महिने विलंबाने वेतन होऊ लागले. म्हणून नेहमीच वेतनासाठी पुन्हा प्लॅन टू नॉन प्लॅनचा लढा उभा करून आंदोलनाच्या मार्गाने यशस्वी करत मुंबईसह राज्यातील 29000 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित सुरू केले. तसेच मुंबई मनपा खाजगी प्राथमिक शाळांच्या अनुदानासाठी आझाद मैदानावर अनेक आंदोलने हांडे यांच्या नेतृत्वाखाली करून शाळांना अनुदान प्राप्त करून दिले.
शिक्षक आरोग्य विमा योजना, सरसकट न मिळणारी निवड श्रेणी, जुनी पेन्शन, शाळा वेतन अनुदान, सेवा संरक्षण, अतिरिक्त शिक्षक समस्या, त्रुटीयुक्त संचमान्यता, थकीत वेतन, शाळाबाह्य कामे, अल्पसंख्याक शाळातील शिक्षकांची भरती यासारख्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी समस्यांची जाण असणारा शिक्षकच शिक्षकांचा आमदार असावा अशी भावना शिक्षण विभागातून व्यक्त केली जात आहे. म्हणुन शिक्षक हांडे यांची संघटनेने एकमताने निर्णय घेऊन उमेदवारी जाहीर केली. अशी माहिती मुंबई प्रदेशाध्यक्ष मनोहर कदम यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *