

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व आधार सेवाभावी संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
अकोट : नुकत्याच जाहीर झालेल्या एन.एम.एम.एस.या
राज्यस्तरीय स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जिल्हा परिषद
वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा खैरखेड येथील कु. शिवानी अनिल डोबाळे व कु. गार्गी अमोल खोब्रागडे या विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल पत्रकारांसाठी काम करत असलेली राष्ट्रीय संघटना
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ आणि आधार सेवाभावी संस्था या दोन्ही संस्थेच्या वतीने या गुणवंत विद्यार्थिनींचे सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.यावेळी एन.एम.एम.एस
परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षक श्री विजय हरणे व शाळेचे मुख्याध्यापक श्री रघुनाथ माळवे व खैरखेड गावच्या सरपंचा सौ.अनुराधाताई विजय मेतकर यांचा शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून खैरखेड गावच्या सरपंचा सौ.अनुराधाताई विजय मेतकर तसेच मुंबईहून आलेले प्रमुख अतिथी म्हणून आधार सेवाभावी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष तथा लोकस्वातंत्र्या पत्रकार महासंघाचे पालघर जिल्हा प्रसिद्ध प्रमुख देवेंद्र शिवचरण मेश्राम, वडील शिवचरण मेश्राम, आई प्रभाताई मेश्राम खैरखेडचे माजी सरपंच श्री. प्रल्हादराव मेतकर, देवेंद्र बनसोड प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे विद्यार्थ्यांनी चांगली मेहनत करून जास्तीत जास्त यश मिळवावे असे मार्गदर्शन देवेंद्र मेश्राम यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांनी यापुढेही उत्तरोत्तर प्रगती करून खैरखेड गावाचे नाव उज्वल करावे असे प्रतिपादन खैरखेड गावच्या सरपंचा सौ. अनुराधाताई मेतकर यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.