
मुंगसे परिसरात तुफान वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस !
तांदळवाडी गावात लग्नाचा मंडप उडाला वऱ्हाडीचे तारांबळ
मुंगसे, ता . अमळनेर दि २६ (वार्ताहर ) – मुंगसे परिसरात रात्री दहा वाजेपासून ते पावणे अकरापर्यंत तुफान वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला आहे . पावसात शेतकऱ्यांच्या शेतातील मालाचे नुकसान झाले .तसेच तांदलवाडी येथील लग्नात नाचणाऱ्यांचे रंग चा भंग होऊन वर्हाळीचे एकच तारांबळ उडाली ! पातोडा नांद्री भागात मेंढपाळ धनगर समाज उतरला असल्याने त्यांच्या वाड्यावर लग्नाचे आयोजन केले होते हळदीचे नवरदेव नवरीला . . तुफाण पावसातून आपला जीव वाचवण्यासाठी त्यांनी गावाचा आसरा घेतला या वादळी पावसामुळे गावातील पत्रे उडालेआहेत .झाडे सुद्धा उन्मळून पडलेले आहेत . तसेच मुंगसे गावात तसेच परिसरात विजेच्या खांब सुद्धा जमिनदोस्त झाली आहेत सकाळी विद्युतप्रवाह उशिरापर्यंत येऊ शकणार नाही .
अचानक आलेल्या या पावसात रात्री दहा वाजता सुरू होऊन पावणे अकरा पर्यंत पाऊण तास पाऊस सुरूच होता .एवढी वर्ष पावसामुळे खापरखेडा धावडे निमगव्हाण सावखेडा आदिगवान मध्ये बरेच नुकसान झालेले आहे .