• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अ‍ॅड. कौस्तुभ पाटील यांची अमळनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

Mar 26, 2024

Loading

अ‍ॅड. कौस्तुभ पाटील यांची अमळनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

अमळनेर प्रतिनिधी
अ‍ॅड. कौस्तुभ पाटील यांची अमळनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली असून सर्व स्तरातून त्यांच्या निवडीच कौतुक होत आहे. व्यवसायाने वकील असणारे कौस्तुभ पाटील हे उत्तम वक्ते व लेखक आहेत. कमी वयापासून त्यांचे सामाजिक व राजकीय कार्य असून आपल्या ‘पेरणी’ या सामाजिक संस्थे मार्फत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत ते करत असतात त्यांच्या निवडी बद्दल युवक काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष कुणाल राऊत उपाध्यक्ष प्रशांत ओगले मीडिया सेल चेअरमन अक्षय जैन प्रदेश सचिव तुषार संदनशीव आशुतोष पवार व विधानसभा अध्यक्ष महेश दगडू पाटील यांनी अभिनंदन केले..
ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या वतीने व मराठी लाईव्ह न्युज वेब पोर्टलच्या कार्यालयात अँड कौस्तुभ पाटील यांचा शाल व बुके देऊन सत्कार ओबीसी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व पत्रकार ईश्वर महाजन यांनी केला..यावेळी काँग्रेसचे युवा पदाधिकारी महेश पाटील उपस्थित होते..
सत्काराला उत्तर देतांना एडवोकेट कौस्तुभ पाटील म्हणाले की तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहणार आहे..व पक्षाचे ध्येय धोरणे तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी ,पक्षाचे
संघटन वाढवणे यावर भर मी देणार आहे असे सांगत माझ्या निवडीबाबत आपण सत्कार केला मी नेहमीच आपल्या ऋणात राहील असे सांगितले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *