• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

निवडणूक कार्य करणारे सर्व शिक्षकांना अतिरिक्त अर्जित रजा मिळावी – खाजगी शिक्षण संघटना

Mar 26, 2024

Loading

निवडणूक कार्य करणारे सर्व शिक्षकांना अतिरिक्त अर्जित रजा मिळावी – खाजगी शिक्षण संघटना

मुंबई | प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च 2024 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर निवडणुकीचे मतदान मुंबईसह राज्यात दिनांक 19 एप्रिल 2024, दिनांक 26 एप्रिल 2024, दिनांक 7 मे 2024, दिनांक 13 मे 2024 व दिनांक 20 मे 2024 अशा पाच टप्प्यात होणार आहे. परंतु दिनांक 2 मे 2024 पासून सर्व शिक्षक विद्यार्थी यांना शाळांची उन्हाळी सुट्टी सुरू होत आहे. यामुळे मुंबईतील बहुतांशी पालकांनी उन्हाळी सुट्टीचे नियोजन केलेले आहे. तसेच शिक्षकांच्या रिझर्वेशन सुद्धा झालेले आहेत. अशा स्थितीमध्ये लोकसभा निवडणूक पार पाडण्याची महत्त्वाची जबाबदारी सर्व शिक्षक उचलणार आहेत. म्हणून निवडणूक कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांना अतिरिक्त रजा मंजूर करावी यासाठी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे मुंबई अध्यक्ष मनोहर कदम व सचिव दत्तात्रय शेंडकर यांनी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक व मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त पत्र लिहून मागणी केली आहे. अशी माहिती संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख अनिल चिकणे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *