• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

सोनगिर ते धुळे रस्त्यावर नाकाबंदी करीत असतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांच्या टिमने 10 लाख 82 हजार चा मुद्देमाल जप्त करत केला गुन्हा दाखल

Mar 26, 2024

Loading

सोनगिर ते धुळे रस्त्यावर नाकाबंदी करीत असतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांच्या टिमने
दहा लाख 82 हजार चा मुद्देमालासह जप्त करत केला गुन्हा दाखल

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दिनांक 24/03/2024 रोजी सायंकाळी 17.15 वाजेच्या सुमारास पोसई सुकदेव धरम, पोका/नितीन जाधव, पोना / 1142 अमरीश सानप, पोकों/261 कमलेश महाले, चालक पोकों/ दिपक पाटील असे आगामी निवडणुकच्या अनुषंगाने सोनगीर फाटयाचे पुढे सोनगीर ते धुळे वाहीनीवर नाकाबंदी करीत असतांना सपोनि/जयेश खलाणे यांना गोपनिय बातमी मिळाली की, एका काळया रंगाची स्कॉर्पीओ गाडी क्र. MH-16-DC-9299 हिच्यातील संशयीत इसम हे काहीतरी गुन्हा करण्याच्या हेतुने त्यांचे कब्जात अवैधरित्या पिस्तुल बाळगुन शिरपुर कडून धुळे कडे जात आहे असे पथकास कळविले. त्यानुसार पोसई सुकदेव धरम यांनी दोन पंचाना बोलवुन बातमीची हकीकत समजावुन सांगून सापळा लावला असता, सायंकाळी 18.15 वाजेचे सुमारास शिरपुर कडुन स्कॉपीओ गाडी क्रं.MH-16-DC-9299 येतांना दिसली. सदर वाहन चालकास थांबण्याचा इशारा करुन गाडी सोनगीर फाटयाचे पुढे हॉटेल भाऊ समोर थांबविली असता, त्यात एकुण तीन इसम मिळुन आले. त्याचे नाव – गाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) मनोज विकास कोथींबिरे, वय 38 वर्ष, 2) महेश बाळासाहेब दारकुंडे, वय 24 वर्ष, 3) नितीन प्रभाकर चव्हाण, वय 33 वर्ष, धंदा- खाजगी नोकरी, सर्व रा. जेडर ता. जि. अहमदनगर असे असल्याचे त्यानी सांगितले. त्यांना तिघांना मिळालेल्या बातमीची हकीकत समजावून सांगुन त्यांना पोलीस पथकाची व पंचांनी अंगझडती देवु केली असता त्यांनी अंगझडती घेण्यास नकार दिल्याने पथकाने त्यांची एकेक करुन अंगझडती घेतली व त्यांची मोटार कारची झडती घेतली असता चालकाच्या शिटाखाली एक अवैध हत्यार (गावठी कटटा) मिळुन आले तसेच त्यांचे अंगझडतीत खालील मुददेमाल मिळुन आले. त्याचे वर्णन व किंमत खालीलप्रमाणे
४०,०००/-रु. कि. एक गावठी बनावटीचे पिस्तुल (गावठी कटटा स्टील बॉडी असलेले, त्याचे एका बाजुस प्लास्टीकची ग्रीप असून, एका बाजुची ग्रिप तुटलेली आहे. तसेच मॅगझीनसह, ट्रोगर व गार्डसह त्यात फायरींग पिन शाबुत असलेले पिस्तुल, त्याचे मंगझीन बाहेर काढून तपासुन पाहता त्यात ७२ जिवंत काडतुस
प्रत्येकी १०००/- रुपये किमतीचा जु.वा. कि. अ. ( गावठी बनावटीचे पिस्तुल कि. ४०,०००/- व ०२ जिवंत काडतुस कि. २०००/- असे एकुण ४२,०००/- रुपये
रुपये १०,०००००/- किमतीची काळया रंगाची स्कॉपओ गाडी क्र.MH-१६-DC-२२९९ जु.वा. कि. अ.
त्यांचे अंगझडतीत रुपये ४०,०००/- किमतीचे ०३ अॅन्ड्राईड मोबाईल मिळुन आले.
एकुण मुददेमालाची किंमत – १०,८२,०००/-
येणे प्रमाणे वरील वर्णनाचे व किमतीचे मोबाईल, मोटार गाडी व गावठी पिस्तुल सह ०२ जिवंत काडतुस असे वरील आरोपीकडे मिळुन आले असून, त्यांना तिघांना सदरचे शस्त्र कोठुन आणले? त्याबाबत परवाना आहे काय? याबाबत विचारपुस करता त्यांनी समाधानकारक उत्तर दिली नाही. म्हणुन पंचाच्या हजेरीत जागीच पंचनामा नोंदवुन पिस्तुल मॅगझीनसह व जिवंत काडतुस तसेच मोबाईल फोन तपासकामी जप्त करुन, तिन्ही इसमांना त्यांच्या वाहन व मुददेमालासह पुढील कारवाइ कामी ताब्यात घेतले. सोनगीर पोलीस स्टेशनचे पथकातील पोकों/ ५४० नितीन रमेश जाधव, वय-३२ वर्ष, यांनी सरकारतर्फे तक्रार दिल्याने त्यांचेविरोधात
गु.र.नं. ६६/२०२४ शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ सह महा. पोलीस कायदा कलम ३७(१)(३) चे उल्लघन १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
नमुद आरोपीतांचा गुन्हेगारी अभिलेख तपासला असता त्यांचेविरोधात खालीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे दिसुन आले.
आरोपी मनोज विकास कोचीबिरे यांचेविरोधात दाखल गुन्हे
of
१२६/२०१७ शस्त्र अधिनियम
१९५९ चे कलम ३,२५
कोतवाली पो.स्टे. अहमदनगर
02
१७४/२०२० शस्त्र अधिनियम
१९५९ चे कलम ३.२५
तोफखाना पो.स्टे. अहमदनगर
४४/२०१७ शस्त्र अधिनियम
१९५९ चे कलम ३.२५
एमआयडीसी पो.स्टे. अ.नगर
०१
०२
आरोपी महेश बाळासाहेब दारकुंडे यांचेविरोधात दाखल गुन्हे ७०५/२०२२ महा. दारु, अधि ६५(ई)
३९६/२०२३ भादवि कलम ३५३,३३२,३३६,१४३,१४७ वगैरे
नेवासा पो.स्टे.
एमआडीस
सदरची कारवाई मा. श्री. श्रीकांत धिवरे सो. पोलीस अधिक्षक सो धुळे मा श्री किशोर काळे, अपर पोलीस अधिक्षक सां धुळे, मा. श्री. साजन सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, धुळे ग्रामीण साक्री विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक जयेश खलाणे, पो उप निरीक्षक सुकदेव धरम, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र महाले, पोकां/नितीन जाधव, पोना/१९४२ अमरीश सानप, पोकां/ २६१ कमलेश महाले, चालक पोकों/ दिपक पाटील, पोका /२२४ महेश ठाकुर यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पो उप निरीक्षक रविंद्र महाले हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *