• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

योगेशजी पाटील (जिल्हा स्वीप नोडल अधिकारी) यांनी घेतली माय एफ.एम. टीमची भेट

Mar 27, 2024

Loading

श्री.योगेशजी पाटील साहेब (जिल्हा स्वीप नोडल अधिकारी) यांनी घेतली माय एफ.एम. टीमची भेट.
जळगाव:लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्वीप कमिटी च्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज श्री. योगेशजी पाटील साहेब (जिल्हा स्वीप नोडल अधिकारी) यांनी लोकप्रिय रेडिओ वाहिनी ९४.३ माय एफ.एम. टीमची भेट घेऊन आर.जे. शिवानी, आर.जे.देवा, श्री.विशाल जगताप यांच्याशी युवा वर्गात पर्यायाने समाजात मतदान जनजागृती करण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबविता येतील याबाबत चर्चा केली. त्याच अनुषंगाने शहरातील महाविद्यालयांत विद्यार्थी वर्गाशी संवाद साधला जाणार आहे. या वेळी त्यांनी रेकॉर्डिंग स्टुडिओला देखील भेट देऊन नेमकी कार्यवाही कशी होते हे जाणून घेतले. याप्रसंगी त्यांच्या समवेत सहाय्यक नोडल अधिकारी डॉ.अतुल इंगळे, प्रा.राहुल वराडे देखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *