
राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी पुरस्कार प्रेरणा देतात
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे .
पुणे: मॅगसेस अवॉर्ड विनर, पद्मश्री डॉ. मणी भाई देसाई यांनी विविध क्षेत्रांमध्ये रचनात्मक कार्ये करुन सर्वसामान्य ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला.त्यांनी दुग्धोत्पादन, कृत्रिम गो पैदास, ऍग्रो फॉरेस्टी, निसर्गोपचार अशा विविध क्षेत्रांमध्ये नेत्र दीपक कार्य करून ज्ञानयोग ,कर्मयोग, भक्ती योग साधला. मनीभाई महान क्रांतिकारी ,ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तर होतेच मात्र जहाल मतवाद व मवाळ मतवाद यांचे रसायन होते. जीवनभर ब्रह्मचर्य राहून त्यांनी जगाचया संसाराचा विचार केला.गुजरात मधून येऊन त्यांनी उरुळी कांचन येथे महान श्वेतक्रांती केली. म्हणून त्यांना श्वेतक्रांतीचे जनक, दुग्ध क्रांतीचे भागीरथी म्हटले तर वावगे ठरणार नाही.डॉ.मनीभाई देसाई महान विभूती ,एक महान महात्मा होते .त्यांची जयंती साजरी करणे म्हणजे विभूती पूजा होय . पद्मश्री डॉ. मणी देसाई हे महान विभूती होत्या .असे पुरस्कारामुळे कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते, प्रेरणेमुळे राष्ट्रनिर्मितीला मदत होते. राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी मनीभाई पुरस्कार महत्त्वाचे आहेत असे मत ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार ह भ प डॉ. रवींद्रजी भोळे यांनी येथे व्यक्त केले. पद्मश्री डॉ.मनिभाई देसाई प्रतिष्ठान निती आयोग भारत सरकार सलग्नित, मिनिस्ट्री एम एस एम इ भारत सरकार सलग्न संस्थेच्या वतीने, व राष्ट्र सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने येथे पद्मश्री डॉक्टर मनीभाई देसाई जयंती निमित्ताने डॉ.मणी देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हिंदुरत्न डॉ.रवींद्रभोळे होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना डॉ. रवींद्र भोळे पुढे म्हणाले की समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची दखल शासनाकडून घेतलीच जाते ,असे नाही. निरपेक्ष भावनेने कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे मूल्यमापन होणे अत्यंत गरजेचे आहे. पद्मश्री डॉ.मनीभाई देसाई यांच्या स्मृती जागवून व ब्रह्म सत्य जगत स्फूर्ती म्हणून पद्मश्री डॉ. मणी देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार राज्य व राष्ट्रीय पातळीवरदिले जातात.
पुरस्काराचे हे हे तिसावे वर्ष आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रयागधाम महात्माजी अमर नित्यानंद जी महाराज, रामकुमार सहानी, निनु भाऊ खर्चे अध्यक्ष पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार संघ, हेमंत श्रीरंग झोपे अध्यक्ष अध्यक्ष समता भातृ मंडळ, अमोल पाटील अध्यक्ष मुक्ताई प्रतिष्ठान, डॉ सचिन गांधी निरो सर्जन पुणे, किरण पाचपांडे सामाजिक कार्यकर्त्या पिंपरी चिंचवड, दिपाली नारखेडे अध्यक्ष लेवा संगिनी मंच पिंपरी चिंचवड, सीनियर रिपोर्टर प्रल्हाद खर्चे, ज्येष्ठ पत्रकार श्री शेलार, सुभाष कट्यारमल सर,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. प्रयागधाम ट्रस्टचे अमर नित्यानंद जी यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की असे कार्यक्रमकार्यकर्त्यांना स्फूर्ती देतात व यातूनच सदृढ हिंदुराष्ट्र निर्माण होईल.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉरविंद्र भोळे यांच्या शुभहस्ते यावर्षीचे पद्मश्री डॉ मणीभाई देसाई पुरस्कारा प्रदान करण्यात आले. श्री विष्णुदास घोडके (प्रशासकीय सेवा) उपसचिव दिव्यांग कल्याण विभाग मुंबई, श्री चेतन सोनवणे( शैक्षणिक )उरुळी कांचन, डॉ. नितीन लोहोकरे संचालक महेश मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल(वैद्यकीय सेवा/हृदय रोग तज्ञ) मांजरी हडपसर, डॉ. निनाद वायकोळे (आधुनिक तंत्रज्ञानाचा सामाजिक कार्यासाठी वापर,) पिंपरी चिंचवड, राजेश दातार गायन( कला क्षेत्र)पुणे, डॉ.बेला गांधी (वैद्यकीय/ एलर्जी तज्ञ )पुणे, सीनियर रिपोर्टर प्रल्हाद खर्चे, श्री नंदकुमार फुले (प्रशासकीय सेवा) दिव्यांग विभाग मुंबई, डॉ.अभिषेक आहेर( शैक्षणिक कार्य )दापोडी पुणे, डॉ.संदीप सोनवणे( वैद्यकीय सेवा) पुणे, डॉ सुरेंद्रकुमार सैनी (वैद्यकीय अर्थो सर्जन ) प्रयागधामट्रस्ट, स्वामी दिव्यानंद गिरी महाराज (अध्यात्मिक/ धार्मिक) कार्य वाघापूर, शबाना राजे खान पटेल (सामाजिक/ आदर्श निवेदिका )हडपसर, श्री निलेश जी टवलारे (हिंदू जनजागृती समिती) राष्ट्रीय कार्ये, अमरावती, सुविधा सुनील नाईक( सामाजिक कार्य )पुणे, डॉ.मार्तंड दिवाकर राव कुलकर्णी( आरोग्यसेवा )किनवट नांदेड, रितेश राजू पांगारकर (सामाजिक रक्तदान कार्य) सहजपूर, ह भ प विनायक महाराज कांचन (अध्यात्मिक/ धार्मिक )उरुळी कांचन, रामभाऊ विठ्ठलराव आवारे( पत्रकारिता/ सामाजिक कार्य) निफाड प्रसिद्धी प्रमुख वारकरी मंच महाराष्ट्र राज्य, अशोक नामदेव खरमाळे (सामाजिक /बँकिंग सेवा) अहमदनगर, सौ लीलावती पंढरीनाथ जंजिरे (सामाजिक/ साहित्यिक) नगर, विजय बाबुराव मोरे (सामाजिक/ साहित्यिक) भिवंडी ठाणे, शिवदास जीवन कांबळे (सामाजिक /शैक्षणिक) कल्याण, गोदावरी बस्वराज दयाडे (सामाजिक) वाघोली, पुणे बस्वराज संग्राम दयाळे (सामाजिक) पुणे, विजय केशव जाधव (शैक्षणिक/ सामाजिक) पोहरे चाळीसगाव, दिलीप गुलाबराव दोडके (लढाऊ सैनिक/ इन्फंट्री )जेजुरी, पुरंदर, ह भ प सुभाष गुलाबराव कुंभारकर (धार्मिक/ अध्यात्मिक कार्य )वनपुरी पुरंदर, ह भ प शिवाजीराव भोसले (आध्यात्मिक/ धार्मिक) कार्य माहूर पुरंदर, नरसिंग नारायण ढवळे (शैक्षणिक) ओढवण लातूर, संजय देवराम सांगळे, (गृह खाते /संरक्षण कार्य )कांकोरी नाशिक, संदीप मारुती थोपटे( ग्रामीण आरोग्य सेवा )सातारा, बापूसाहेब महादू शिंदे (आदिवासी सेवा/ शैक्षणिक कार्य )ठाणे, अरविंद कुमार सिंग (शैक्षणिक /सामाजिक )पुणे, मंगला एकनाथ घनवट (सामाजिक )अंतरवाली अनगर, आप्पासाहेब अनाजी रहाटक (आदर्श शेतकरी )अनगर, आबा ईश्वर सरोदे, (सामाजिक) शिरूर पुणे, बबुशा शिवराम चोरे (आदिवासी /शैक्षणिक सेवा) ठाणे, ह भ प रामेश्वर नारायण गावंडे (आध्यात्मिक )बुलढाणा, माधव नारायणराव अनासाने( सामाजिक )अकोला, डॉ. चंद्रप्रकाश श्रीहरी महाले( आरोग्य सेवा) अकोला, ऍड अनुपजी जयस्वाल (हिंदू धर्मकार्य )अमरावती, ऍड राहुल कावरे (विधी तज्ञ /न्याय विभाग) अमरावती वनी, मनोहर नामदेवराव बोरकर (सामाजिक) अमरावती निमखेड बाजार, अमितजी लालचंदजी नहार( सामाजिक )मरकळ पुणे, प्रशांत उत्तमराव घाडगे (दिव्यांग सेवा) वानवडी पुणे, धर्मेंद्र कृष्णकांत सातव पाटील( दिव्यांग सेवा )वाघोली पुणे, हभप लालजी खडसे( आध्यात्मिक) गुलजारपूर अमरावती, श्रीमती रेखा विजय मेसरे (संगीत/ कलाक्षेत्र) लोहगाव पुणे, कुमारी आकांक्षा लक्ष्मण पिंगळे( बालकलाकार )पुणे, भाग्यश्री पवनकुमार कट्यारमल (दिव्यांग सेवा )पुणे, गजानन भाऊ दशरथ चिंचवडे (पोलीस सेवा) पुणे, चिमणाजी विश्वनाथ सावळे (सामाजिक) नांदेड, पंडित कुंडलिक जाधव (शैक्षणिक) दौंड, सोमनाथ अशोक भोसले (सामाजिक )बारामती, शामराव स्वामी पाटोळे (सामाजिक) दौंड, डॉ.अशोकराव वसंतराव शिंदे (सामाजिक )मढेवडगाव, यादव धोंडीबा केंदळे (सामाजिक) पुणे, संग्राम भैय्या मिठू सेठ शिंदे (सामाजिक )मढेवडगाव, बाबासाहेब भाऊसाहेब साळवे (सामाजिक) मढेवडगाव, श्रद्धा केळजी (आरोग्यसेवा) मुंबई, बाळकृष्ण भीमराव गावडे (सामाजिक )काष्टी, बाळासाहेब सोनबा बनकर +आदर्श शेतकरी) गिरीम, अरुण दगडू खताळ (शैक्षणिक )गिरिम, दीपक रोकडे (सामाजिक )अ नगर, डॉ. दीपक दादाराव जाधव (कलाक्षेत्र,) बारामती, डॉशरद शिवाजी नामधे (पोलीस भरती शिक्षक कार्य, ) बारामती,कु. नेत्रा नवनाथ नाईकवाडी (चित्रकार क्षेत्र, ) पुणे,डॉ.ज्योती जालिंदर किरवे (शैक्षणिक क्षेत्र, ) पुणे ,डॉ.संदीप भगवान वाकडे (शैक्षणिक क्षेत्र), पुणे , श्रीकृष्ण माणिकराव कुलकर्णी (सामाजिक )पुणे वरील प्रमाणे पद्मश्री डॉ.मनीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार राष्ट्र सेवा समिती, महाराष्ट्र राज्य वतीने जाहीर करण्यात आलेले आहे. याच कार्यक्रमात डॉ. निनाद वायकोळे, अमोल पाटील, सौ किरण पाचपांडे, यांना जळगाव येथील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.अंकुश दळवी, नॉर्मल नॉटन ,प्रफुल्ल झोपे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल डी साळवे सर यांनी केले. हा कार्यक्रम डॉ.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन सरदार पटेल चौकपुणे येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला राज्य व इतर राज्यातून सुद्धा अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.