• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

युतिका पाटीलचे यश…विज्ञान विषयात 100 पैकी 100,तर विदयालयात 97 टक्के गुण मिळवत द्वितीय..

May 28, 2024

Loading

युतिका पाटीलचे यश…

श्री. एन. टी. मुंदडा ग्लोबल व्ह स्कूल अमळनेरची विद्यार्थिनी कु. युतिका संजीव पाटील हिने विज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून विद्यालयात 97% गुण मिळवत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन विद्यालयाच्या उज्ज्वल परंपरेत भर घातली आहे.
युतिकाला प्राचार्य लक्ष्मणसर,उपप्राचार्य विद्या लक्ष्मण मॅडम, विज्ञान शिक्षक उमर पिंजारीसर, प्रशांत सर, अदिती टिचर,योगेश्वरी टिचर, गुणेशसर, युवराजसर,किरणसर,शर्मा सर , जोशीसर,विजया टिचर यांचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय बेंगलोर येथे बोईंग इंटरनॅशनल कंपनीत कार्यरत व इ. 10 वीला अमळनेर येथील डी. आर. कन्या शाळा येथून 99.40% गुण मिळवून उत्तीर्ण झालेली मोठी बहीण कु. किंजल पाटील हिची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले आहे. कु. युतिकाचा  अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करण्याचा मानस असून “आम्ही अमळनेर” राज्यात.. देशात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करून गावाचे, शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे सांगितले..

तिला सोनारसर…तसेच आई वडील, आजोबा यांचे मार्गदर्शन लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *