

जुन्या पेन्शन करिता सर्वस्व पणास लावेल- समता शिक्षक परिषदेच्या सभेत शिक्षक आमदार किशोर दराडे यांचे प्रतिपादन
शिक्षकांच्या प्रश्नाकरिता उपोषण केले. अनेक दिवस आंदोलन केलीत. पायी दिंडी यात्रा काढली. शिक्षकांची अनेक प्रश्न मार्गी लावलीत. भरीव निधी उपलब्ध करून दिला. राष्ट्रीयकृत बँकेत वेतनाचा प्रश्न मार्गी लावला. जुन्या पेन्शन योजने करिता दिवस रात्र पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात यश मिळविले. पाच हजार शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचे चार लाभ मिळवून दिले आहेत. एकवीस हजार शिक्षकांना याचा लाभ लवकरच मिळवून देणार आहे. जुन्या पेन्शन योजनेची संबंधित सर्व प्रश्न मार्गी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी हाॅटेल देव हाईटस जळगाव येथे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ आयोजित समता शिक्षक परिषदेच्या सभेमध्ये केले.
समता शिक्षक परिषदेचे माध्यमिकचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये लक्ष वेधून घेणारे मुद्दे मांडले. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्ट व्यवस्था ही पारदर्शक आणि भ्रष्टाचार विरहित झाली पाहिजे. जुन्या पेन्शनचा प्रश्न, टप्पा अनुदानाचा प्रश्न, बदली मान्यतेचा प्रश्न, तसेच निवड श्रेणीकरिता कोणतीही अट न राहू देण्याचा प्रश्न , शिक्षकांच्या सर्व प्रकरणांसंबंधी ऑनलाईन व्यवस्था निर्माण करणे, शिक्षकांची रखडलेली प्रकरणे मुदतीच्या हात काढणे, या सर्व प्रश्नांना आदरणीय किशोरजी दराडे हे नक्की न्याय देतील असा आशावाद आपल्या मनोगतामध्ये त्यांनी व्यक्त केला.
प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर मिलिंद बागुल यांनी मनोगत व्यक्त करताना किशोर भाऊ दराडे यांच्या कामाचे सविस्तर वर्णन केले. किशोर भाऊ दराडे यांनी शिक्षकांचा राष्ट्रीयकृत बँकेचा प्रश्न मार्गी लावला असून शिक्षकांची अनेक देयके तात्काळ मार्गी लावली आहेत. आपल्या कर्तव्याप्रति प्रचंड निष्ठा असणारे व्यक्तिमत्व म्हणजे किशोर भाऊ दराडे आहेत. सामान्य शिक्षकाशी नाळ जोडणारा किशोर भाऊ दराडे सारखा चांगला उमेदवार आपण निवडून द्यावा, असे आवाहन आपल्या मनोगतात त्यांनी केले.
कार्यक्रमास शिक्षक नेते संभाजी पाटील, समता शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष रणजीत सोनवणे, विभागीय कार्याध्यक्ष प्रमोद आठवले, संदिप घुगे, उपाध्यक्ष गणेश बच्छाव उपाध्यक्षा सरिता वासवानी, सरचिटणीस एस आर महाजन, समताचे उच्च माध्यमिक विभागाचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप सुरवाडकर, महिला पूर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी कोळी, सचिव वर्षा अहिरराव, सहसचिव भारती ठाकरे, जळगाव तालुकाध्यक्ष प्रज्ञा तायडे, डाॅ. बी.डी.शिरसाठ, भैय्यासाहेब देवरे, भीमराव बागुल, अविनाश बागुल, राजेंद्र चव्हाण, देशमुख सर, प्रकाश तामस्वरे, राहुल पाटील, एरंडोल तालुका अध्यक्ष चिंतामण जाधव, सुधाकर मोरे, जामनेर तालुकाध्यक्ष सादिक तडवी, पी. एम. पाटील, सहसचिव शंकर भामेरे, स्वाती पवार, कविता चौधरी, हेमांगी कोल्हे तसेच जिल्हाभरातून अनेक शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद आठवले यांनी तर आभार गणेश बच्छाव यांनी मानले.