• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अमळनेर येथील आर्मी स्कुलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

Jun 21, 2024

Loading

अमळनेर येथील आर्मी स्कुलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

अमळनेर – येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये “आंतरराष्ट्रीय योग दिवस” साजरा करण्यात आला. निवृत्त प्राचार्य एस यु पाटील व क्रीडा शिक्षक आर ए घुगे यांनी योगाचे महत्व विशद करून विविध योगाचे प्रात्यक्षिके करून दाखवलीत. प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, प्रभारी मुख्याध्यापक बी डी पाटील, जेष्ठ शिक्षक एस ए बाविस्कर यांनी योगशिक्षक एस यु पाटील यांचा सत्कार केला. उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले. संजय पाटील यांनी आभार मानले. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.

अमळनेर – योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवताना एस यु पाटील. समोर विद्यार्थी व शिक्षक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *