
आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने व्याख्यान काल दि.20 जून 2024 रोजी आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग अमळगाव ता. अमळनेर जि. जळगाव येथे आर्ट ऑफ लिव्हिंग अमळनेर सेंटरचे योग शिक्षक व सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्री. बी. एन. पाटीलसर यांचे 'योग आणि आरोग्य' या विषयावर विद्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी बी. एन. पाटीलसर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिन आपण 21 जून रोजी दरवर्षी का साजरा करतो, त्याचे महत्त्व, योग व ध्यान (मेडीटेशन) म्हणजे नेमके काय, अध्ययन करताना.. अभ्यासात एकाग्रता कशी साधावी, दररोज योग व ध्यानधारणा करणे किती महत्त्वाचे आहे, आरोग्य संपन्न, आनंददायी जीवनासाठी योग अत्यंत आवश्यक असून शरीर व मन यांच्यात संतुलन साधण्यासाठी नियमितपणे व सातत्यपूर्ण योग व मेडीटेशन दररोज आपण केले पाहिजे. याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक आबासाहेब आर. यु. पाटीलसर यांनी आपण सर्वांनी जीवनामध्ये योगासने, प्राणायाम,मेडीटेशन करणं किती गरजेचे आहे, याविषयी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजीव पाटीलसर यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.