• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अमळनेरात सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावा,प्रकाशभाई पाटील युवा मंचचा स्तुत्य उपक्रम

Jun 30, 2024

Loading

अमळनेरात सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावा,प्रकाशभाई पाटील युवा मंचचा स्तुत्य उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी
श्री प्रकाश भाई पाटील युवा मंच अंमळनेर आणि बीडीएस मार्केटिंग कंपनीतर्फे अमळनेर मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी तसेच नागरिकांना रोजगाराची सुवर्ण संधी घेऊन आले आहेत यासाठी प्रकाशभाई पाटील ,युवा मंच तर्फे मतदार संघातील प्रत्येक गावागावात माहिती पत्रकाच्या माध्यमातून बेरोजगार तरुण,तरुणी,महिला आणि नागरिकांपर्यंत माहिती पुरवण्यात आली आहे की वरील कंपनी तर्फे ऑनलाईन फॉर्मसाठी www.prakashbhaipatil.com या वेबसाईटवर फॉर्म उपलब्ध करून दिले आहेत तर ऑनलाईन फॉर्म हा आपल्या मोबाईल वरून भरण्यात येणार असून ज्या कुणाकडे मोबाईल नसेल तर त्यांनी श्री. प्रकाशभाई पाटील,युवा मंच अमळनेर यांच्या संपर्क कार्यालय,तळमजला शिवांस बिझनेस हब,धुळे रोड,अमळनेर येथे फॉर्म उपलब्ध करून दिलेले आहेत बीडीएस मार्केटिंग कंपनी आणि युवा मंच तर्फे दिनांक 26 व 28 जून 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत शेकडो मुलांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यात BDS कंपनीचे विविध पदाधिकारी आणि प्रकाशभाई पाटील यांनी मुलाखती घेतल्या,त्यात उमेदवाराकडून असे कळत होते की विप्रो कंपनी व्यतिरिक्त या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या रोजगाराची संधी उपलब्ध नाही आणि त्यातही फक्त कंत्राटदारांकडून रोजगार हा काही काळापुरता उपलब्ध होतो आणि घरी थांबावे लागते परंतु आपल्या प्रकाशभाई युवा मंच तर्फे आपणांस कायमस्वरूपी रोजगार हा दिला जाणार असून प्रत्येक कामगारांसाठी 5 लाखापर्यंत इन्शुरन्सही उपलब्ध होणार आहे याची ग्वाही ही दिली.गेल्या दोन दिवसात शेकडो गरजू उमेदवार यांनी मुलाखती देऊन आनंद व्यक्त केला की आपल्या परिसरात रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असून त्यातून कुटुंबाला आर्थिक सहकार्य होईल तसेच स्वत: च्या शैक्षणिक कामात मदतही होईल यासोबत काही उमेदवारांनी असे विचारले की खरंच कंपनी आहे का? खरच आम्हाला रोजगार दिला जाणार आहे का? असे प्रश्न करीत होते यावर प्रकाशभाई पाटील यांनी विचारणा केली की तुम्ही असा प्रश्न का करताय? यावर तरुणांनी उत्तर दिले की बरेच राजकारणी लोकांनी बेरोजगार तरुणांना रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते.परंतु आजपर्यंत कोणीही रोजगार दिला नाही म्हणून आम्हाला शंका वाटते यावर प्रकाशभाई पाटील यांनी उत्तर दिले की जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही आपल्या कंपनीत काम करताना दिसणार आहेत असे आश्वासन दिले.
याप्रसंगी प्रकाशभाई पाटील, सुरेश पाटील मा. सरपंच सुंदरपट्टी,प्रविण देशमुख सामा.कार्यकर्ता,शामकांत पाटील मा. सरपंच गोवर्धन बोरगाव, अमित ललवाणी सामा कार्यकर्ता,हर्षल देशमुख राजेंद्र पाटील ,रामेश्वर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *