डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नलॉजी, पिंपरी. व IKD Maths अकॅडमी अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने.
अमळनेर शहरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील कारकीर्दीसाठी मार्गदर्शन मिळाले. दिनांक ४ जुलै २०२४ रोजी नर्मदा रिसॉर्ट, गलवाडे रोड येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मान्यवर अतिथी म्हणून प्रो. धीरज अग्रवाल ( Director of Central Corporate Relations, Dr.D.Y.Patil Institute of Technology, Pimpri, Pune ), डॉ. पुष्पराज वारके ( F.E. Dean, Dr.D.Y.Patil Institute of Technology, Pimpri, Pune ), मा. किरण माळी ( IKD Maths academy, Amalner ) आणि एस.डी. देशमुख सर ( माजी मुख्याध्यापक साने गुरुजी विद्यामंदिर, अमळनेर ) उपस्थित होते.
या कार्यक्रमात दोन मुख्य मुद्दयांवर चर्चा झाली. पहिली म्हणजे १२वी नंतरच्या शिक्षण आणि कारकीर्दीच्या पर्यायांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि दुसरी म्हणजे IKD Maths Academy च्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्टतेचा सन्मान करणे. यामध्ये १२वी बोर्ड परीक्षा आणि MHT- CET परीक्षेत त्यांनी केलेल्या यशस्वी निकालांचा समावेश होता.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याबद्दल सुज्ञ निर्णय घेण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि मार्गदर्शन देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांनी विविध क्षेत्रातील शिक्षण आणि रोजगाराच्या संधींबद्दल विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तसेच, यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि गुणांवर देखील प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात IKD Maths Academy च्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. एकूण 180 विद्यार्थ्यांना त्यांचा यशाबद्दल गौरवीत करण्यात आले. त्यांच्या यशामध्ये त्यांच्या कठोर परिश्रमांसोबतच अकादमीच्या मार्गदर्शनाचाही मोठा वाटा होता, याचे सर्व वक्तांनी कौतुक केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यांच्या भविष्याची दिशा स्पष्ट झाली
हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आयोजकांचे सर्वथान कौतुक केले जात आहे. यामुळे अमळनेर शहरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची दिशा निश्चित करण्यास मदत मिळाली.
कार्यक्रमाचे समन्वय यंत्र अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. नितीन शेरजे तसेच प्रा. पंकज परदेशी आणि प्रा. जितेंद्र नारखेडे यांनी केले प्रा. मुरली इंगळे यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.