
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर साक्षी महाजन चे सीए परीक्षेत यश
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर
साक्षी महाजन चे सीए परीक्षेत यश
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- मनात आत्मविश्वास जिद्द ,चिकाटी असेल तर आपण पाहिलेले स्वप्न सत्यात उतरते हे तेवढेच सत्य आहे.. कुमारी साक्षी भूषण महाजन या विद्यार्थिनींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपलं ध्येय पूर्णत्वास नेले आहे.. ती सीए परीक्षेत उत्तीर्ण होऊन आजच्या पिढीतील विद्यार्थिनींना एक आदर्श निर्माण केला आहे..
सविस्तर माहिती अशी कि कु.साक्षी भुषण महाजन हि श्री.भुषण पंडीत महाजन व सौ.भावना भुषण महाजन,रा.भडगाव ता.भडगाव जि.जळगाव यांची मुलगी असून.ती सी.ए.Intermediate Exam परीक्षा पास झाली.तिचे 10वी पर्यंतचे शिक्षण लाडकूबाई या शाळेत पुर्ण झाले.10वी ला तिला 90% गुण मिळाले.पुढिल शिक्षण के.टी.एच.एम.नाशिक येथे 11वी ,12वी व Bcom येथे पुर्ण केले.12वी ला तीला 89% गुण मिळाले व Bcom ला 8.52 CGPA गुण प्राप्त झाले. याच कालावधीत ती सी.ए.चा अभ्यास व परीक्षा देत होती.घरून फॅमिलीचा तीला सर्वात जास्त सपोर्ट होता.आणि विशेष करून आईचा.तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.प्रथम तिने CA – Foundation पूर्ण केले व नंतर CA Intermediate पुर्ण केले.तिचे मामा श्री.मनोज सुभाष अहिरे (माध्यमिक शिक्षक,बोरकुंड ता.जि.धुळे) आईचे वडिल श्री.सुभाष दौलत माळी बोरकुंड, यांच्या कडून खूप खूप शुभेच्छा.तसेच तीच्या आईचे मामा विलासराव पाटील (माजी.मुख्याध्यापक,तसेच अध्यक्ष:-महात्मा फुले माध्य.विद्या.देवगाव देवळी ता.अंमळनेर जि जळगाव )यांच्या कडून देखील खूप शुभेच्छा देऊन तिचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात आले..