असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात वृक्ष दिंडीचे आयोजन
1 min read

असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात वृक्ष दिंडीचे आयोजन

Loading

:असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात राष्ट्रीय हरित सेनेतर्फे आज टाळ मृदुंगांच्या गजरात वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले.यानिमित्त आज ग्रीन डे साजरा करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हिरव्या रंगाचे टी-शर्ट, कुर्ता पायजमा व विद्यार्थिनीनी हिरव्या रंगाच्या साड्या व ड्रेस परिधान केले होते. वृक्षदिंडी दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध पर्यावरण विषयक घोषणा देऊन वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृती केली. राम मंदिर संस्थांनचे यासाठी सहकार्य लाभले. टाळकरी गोपाळ भोळे,गलू चौधरी, डिगंबर पाटील, वासू चौधरी व गावातील नागरिक वृक्ष दिंडीत सहभागी होते.
वृक्षदिंडीनंतर संस्थेचे सचिव कमळाकर सावदेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विलासराव चौधरी, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, हरित सेना प्रमुख श्री गोपाळ महाजन, डी. जी.महाजन, शुभांगीनी महाजन, मंगला नारखेडे,भावना चौधरी, प्रेमराज बऱ्हाटे, सचिन जंगले व इतर शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमा नंतर वन महोत्सव अंतर्गत प्राप्त झाडांच्या रोपांचे वाटप मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपाळ महाजन, भावना चौधरी, मीनाक्षी कोल्हे प्रेमराज बऱ्हाटे, सचिन जंगले व इतर शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *